
स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ! जि.प. सभगृहात स्वच्छतेची शपथ
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ!
जि.प. सभगृहात स्वच्छतेची शपथ
वाशिम दि.१६- गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वाशिम जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आला.
जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. दि. १५ सप्टे. रोजी जिल्हा परिषदेमध्ये अभियानाच्या स्टॅण्डीचे विमोचन करण्यात आले. १६ सप्टे. रोजी जि.प. चे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, कृषी विकास अधिकारी बंडगर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ! जि.प. सभगृहात स्वच्छतेची शपथ"
Post a Comment