
सिविल लाईन्स परिसरामध्ये पाणपोई व पक्षी गुरढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
साप्ताहिक सागर आदित्य
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था.
अध्यक्ष- देवाजी तांबे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि
अमरावती विभाग उपाध्यक्ष-सीमाताई सातपुते यांचे सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभते.
आज दिनांक. 30 मार्च गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षानिमित्त
ठिकाण-सिविल लाईन्स परिसरामध्ये पाणपोई व पक्षी गुरढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. चैत्र पाडवा लागला की रखरखत्या उन्हाची चाहूल जाणवते सिविल लाईन परिसरात दाखलिया हॉस्पिटल जवळ ग्रामीण भागातील पेशंट येतात. त्यांना तासंतास बसावं लागते हेच बाब लक्षात घेऊन. त्यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. व स्टेडियम जवळ मोकाट गाई व इतर प्राणी पक्षी यांच्याकरिता झाडाखाली पाण्याचा हौद ठेवला आहे. आज आपल्या संस्थे च्या कार्याचा 36 जिल्हे व 22 देशाबाहेर असा उल्लेखनीय विस्तार झाला आहे व आपण एकमेकांच्या सहकार्याने असाच संस्थेचा विस्तार वाढत राहो.हीच आजच्या दिवशी सदिच्छा.
उपस्थित पदाधिकारी
1) भाग्यलक्ष्मी देशमुख
2) वैशाली आरु
3) अनिता धुमाळे.
0 Response to "सिविल लाईन्स परिसरामध्ये पाणपोई व पक्षी गुरढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था"
Post a Comment