
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण अंतर्गत संगणक परिचालकाचे प्रशिक्षण संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण अंतर्गत संगणक परिचालकाचे प्रशिक्षण संपन्न
वाशिम दि. ९
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (२०२३) अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पंचायतचे, संगणक परिचालक (आॅपरेटर) यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या निर्देशानुसार दि. ७ डिसेंबर पासुन तालुका स्तरावर या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. कारंजा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील प्रशिक्षणानंतर आज (दि९) मंगरुळपीर तालुक्यातील संगणक परिचालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान काही गावांची माहिती आॅनलाईन करण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शालिकराम पडघन यांनी मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी बाळकृष्ण अवगण यांनी मार्गदर्शन केले. राम श्रृंगारे यांनी पीपीटी च्या माध्यमातुन माहीती कशी भरायची याची माहिती दिली. शंकर आंबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विस्तार अधिकारी राऊत, जिल्हा कक्षाचे प्रफुल्ल काळे, विजय नागे, तालुका व्यवस्थापक (बीएम) निखिल गभणे, तालुका कक्षाचे प्रविण आखाडे, अभिजित गावंडे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील सर्व आॅपरेटर यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन प्रविण आखाडे यांनी केले.
0 Response to "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण अंतर्गत संगणक परिचालकाचे प्रशिक्षण संपन्न"
Post a Comment