-->

धन्य ती माता, धन्य तो पिता आणि धन्य तो पुत्र

धन्य ती माता, धन्य तो पिता आणि धन्य तो पुत्र

 


साप्ताहिक सागर आदित्य 

धन्य ती माता, धन्य तो पिता आणि धन्य तो पुत्र

याच मातेच्या पोटातून 

 जन्म घेवू आणि मायभूमिची सेवा करु !

  देशभक्तीची भावना ही सर्वोच्च भावना आहे. हीच भावना देशवासीयांना एकमेकांना एकजुट होण्यासाठी बांधुन ठेवते. प्रखर देशभक्तीसोबत कशाचीही तुलना होवू शकत नाही. देशभक्तीसाठी देशवासीयांची पक्ष, जात, पंथ, संघटना विसरुन कशी एकता व एकजुट होते याचे उदाहरण आज वाशिमकरांनी आज हजारोंच्या संख्येने शहीद अमोल गोरे यांना जड अंत:करणाने व डबडबलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप देतांना दाखवून दिले. भारत देश आणि या देशातील कोट्यावधी भारतीयांचा जिव वाचविण्यासाठी पॅरा कमांडो अमोल गोरे सारखे अनेक शहीद जवान आपल्या परिवाराचा त्याग करुन अत्यंत कठीण परिस्थितीत व अत्यंत विषम हवामानात राहून डोळ्यात तेल घालून शत्रुंपासून सिमेचे रक्षण करतात. या विर सैनिकांचा आम्हा भारतीयांना गर्व व अभिमान असून या निधड्या छातीच्या सैनिकांमुळेच आपण सुखाने झोप घेत आहोत हे आपण कधीच विसरु नये.

  आपला मुलगा मोठा झाल्यावर डॉक्टर, इंजिनियर व्हावं अशी बहूतांश आईवडीलांची इच्छा असते. मात्र आपल्या पोटचा मुलाने मोठे होवून देशाची सेवा करावी असा निश्चय करुनच काही आईवडील मुलांचे पालनपोषण करतात. आपल्या पोटच्या मुलाला देशासाठी अर्पण करणार्‍या अशा मातापित्यांचे ऋण भारत देशाची ही भूमि आणि आपण देशवासी कधीच फेडू शकणार नाही. अशा मातापित्यांचा त्याग आणि बलीदान आम्ही भारतवासी कधीच विसरणार नाही. कारण हीच आपली भारतीय संस्कृती आहे. ती संपुर्ण जगात पुजनिय आहे. कारण इतर देशात रक्ताच्या नातेसंबंधांची चिरफाड होत असतांना या पवित्र भारत भूमिने हजारो वर्षापासून आई, वडील, भाऊ, बहीण असे नातेसंंबंध हजारो वर्षापासून जपून ठेवले आहेत. व वेळ पडल्यास देशासाठी या नातेसंबंधाचाही त्यागही केला आहे.

  आज आम्हा वाशिमकरांना अत्यंत गर्व आणि अभिमान आहे की, अमोल गोरे सारखे अनेक विर जवान या वाशिमच्या पवित्र भूमिने आम्हाला दिले आहेत. या सैनिकांच्या महान कार्याने ही भूमि खरोखरच पवित्र झाली आहे.

,  आज पॅरा कमांडो शहीद अमोल गोरे देशाची सेवा करतांना व इतरांचा जिव वाचवितांना आपले आईवडील, भाऊ, बहीण, पत्नी व आपल्या छकुल्याला एकटे सोडून आपल्यातून निघून गेले. शहीद अमोल गोरे यांना अखेरची मानवंदना देतांना हजारोंच्या जनसमुदायाच्या डोळ्यातून अश्रु ढाळले गेले. अनेकांचे डोळे डबडबले. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने, निस्वार्थपणे मदत केली. देशभक्तीची ही भावना खरोखरच अत्यंत पवित्र असून याच भावनेच्या धाग्याने आपले मन एकमेकांमध्ये बांधल्या गेले आहे. देशासाठी प्राण देणार्‍या आपल्या या भावांसाठी एक होण्याची भावना आमच्यात आहे आणि अखंडपणे राहील.

  पॅरा कमांडो शहीद अमोल गोरे आम्हा वाशिमकरांचे भूषण होते आणि आहेत. त्यांचा देशाप्रती त्याग आम्ही कधीही विसरणार नाही. त्यासोबतच या शहीदाच्या परिवारातील आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी यांच्या त्यागापुढेही आम्ही नतमस्तक होतो. या शहीदाला जन्म देणार्‍या त्या मातेला आम्ही चरणस्पर्श करतो. देशाला पुत्र अर्पण करणार्‍या या मातेच्या पोटी हजारो वेळा जन्म घेवून मातृभूमिची सेवा करु !


धन्य ती माता, धन्य तो पिता आणि धन्य तो पुत्र

शहीद अमोल गोरे अमर रहे ! अमर रहे ! अमर रहे ! वंदे मातरम् !

Related Posts

0 Response to "धन्य ती माता, धन्य तो पिता आणि धन्य तो पुत्र"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article