-->

कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना ई-केवायसी, बॅंक खाते आधार सिडींग करता येणार

कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना ई-केवायसी, बॅंक खाते आधार सिडींग करता येणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना ई-केवायसी, बॅंक खाते आधार सिडींग करता येणार


> पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन 


> कृषी व पोस्ट विभागाचा उपक्रम


वाशिम,  :  येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कृषी महोत्सवात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बॅंक खात्यांचे ई-केवायसी आणि आधार सिडींग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाचे स्टॅाल उभारण्यात येणार असून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी लाभार्थ्यांना केले आहे.


प्रकल्प संचालक, आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या  संयुक्त विद्यमाने  ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रवारी २०२४ रोजी या पाच दिवसीय वत्सगुल्म कृषी महोत्सयव २०२४ चे आयोजन बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण भवनाचे प्रांगण, काटा- कोंडाळा रोड, सुंदर वाटीका, वाशिम येथे करण्यात आले आहे. 


या कृषी महोत्सवात कृषी विभाग व भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार २८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, आधार सिडींग करणे प्रलंबित आहे. अशा प्रलंबित लाभार्थ्यांना या महोत्सावात पोस्ट विभागाच्यावतीने नवीन बॅंक खाते उघडण्यासाठी स्टॉलची उलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे  ई-केवायसी व आधार सिडींग प्रलंबित आहेत अशा लाभार्थ्यांनी कृषी महोत्सेवाला भेट देवून आपले ई-केवायसी व आधार सिडींग करुन घ्यावे.  


 ई-केवायसी व नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड यासह स्वत: लाभार्थी हजर राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कृषी महोत्सवात सहभाग नोंदवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.


0 Response to "कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना ई-केवायसी, बॅंक खाते आधार सिडींग करता येणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article