गीत संगीतातील आश्चर्य, राष्ट्राचे वैभव भारतरत्न, गानकोकीळा लतादिदीच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा !
साप्ताहिक सागर आदित्य/
गीत संगीतातील आश्चर्य, राष्ट्राचे वैभव भारतरत्न, गानकोकीळा लतादिदीच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा !
कारंजा : भारताची आन - बान - शान असलेल्या, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद असलेल्या, भारताच्या पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अवार्ड सह भारताच्या " भारतरत्न " ह्या सर्वोच्च पुरस्कारानी गौरवांकित असलेल्या, हिंदी - मराठी - गुजरातीसह कित्येक भाषांवर सलग सत्तर ते पंचाहत्तर वर्षे प्रभुत्व गाजवीत जागतिक दर्जाच्या एकमेव "गानकोकिळा " ठरलेल्या, सुरांच्या जादुगर, लता दिदी मंगेशकर यांचे, ब्रिच कॅन्डी इस्पितळात, गेल्या 28 दिवस आजाराशी झुंज देत असतांना, वयाच्या 93 व्या वर्षी आज दि.०६ फेब्रु. रोजी सकाळी निधन झालं . त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या " प्रभुकुंज " निवासस्थानी नेण्यात आलं असून, देशाकडून राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आलेला असून, शासकिय इतमामात, त्यांच्या जवळच्या आप्तेष्ट व महत्वाच्या निवडक राजकिय नेते, अधिकारी, चित्रपट कलावंताचे उपस्थितीत मुंबई येथील, शिवाजी पार्कवर त्यांना अंत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला प्राप्त झालं आहे . त्यांच्या निधनाची वार्ता कळताच कारंजा येथील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या आवाजातील सर्वात सुप्रसिध्द असलेले" ए मेरे वतन के लोगो जरा ऑख मे भरलो पाणी " हे गाणे सर्वत्र समाजमाध्यमावर फिरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे . कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, माजी सभापती जयकिसन राठोड, ओंकार मलवळकर, उमेश अनासाने, नंदकिशोर कव्हळकर, मोहित जोहरापूरकर, विजय पाटील खंडार, सुनिल गुंठेवार, हिमंत मोहकर, सौ. आशाताई सुरवाडे, सौ . अर्चनाताई तोमर, सौ छायाताई गावंडे, रामबकस डेंडूळे, प्रदिप वानखडे, देविदास नांदेकर, राजेश चंदन, डॉ मुजफ्फर खान, नितीन गढवाले, गणेश बाबरे, प्रसन्न पळसकर, विजय राठोड, डॉ कुंदन श्यामसुंदर, डॉ ज्ञानेश्वर गरड, ज्ञानेश्वर खंडारे, लोमेश पाटील चौधरी, रमेश देशमुख, रोहीत महाजन, कमलेश कडोळे, कैलास हांडे, पत्रकार आरिफभाई पोपटे, मोहम्मद मुन्निवाले, एकनाथ पवार, कालूभाई आदी मंडळींनी दुःख प्रगट केले असून, .. "आता अशी सरस्वती होणे नाही ! लतादिदी ही अनमोल रत्न होत्या . अनमोल गानसम्राज्ञी होत्या . " असे कळवीत भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली .
0 Response to "गीत संगीतातील आश्चर्य, राष्ट्राचे वैभव भारतरत्न, गानकोकीळा लतादिदीच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा !"
Post a Comment