-->

गोंधळी समाजाने केले घराघरात नरविर तानाजी मालुसरेंना अभिवादन !

गोंधळी समाजाने केले घराघरात नरविर तानाजी मालुसरेंना अभिवादन !


साप्ताहिक सागर आदित्य/

गोंधळी समाजाने केले घराघरात नरविर तानाजी मालुसरेंना अभिवादन !                                

कारंजा : शिवरायांच्या मावळ्यां मधील, त्यांचा आवडते मावळे मित्र, तानाजी मालुसरे हे होते . ते गोंधळी समाजाचे होते . त्याकाळी शिवरायांच्या सैन्यात अठरा पगाड जाती जमातीचे लोकं होते . आणि विशेष करून, गोंधळी, नाथजोगी, भराडी, बहुरूपी, जोशी अशा भटक्या जमातीच्या लोकांना सह्याद्रीच्या डोंगर कपारीची विशेष माहिती होती . आणि त्यांची वेशभुषा, बोलीभाषा, करपल्लवी, नेत्रपल्लवी, मशाल पल्लवी इ . चा महाराजांनी विशेष उपयोग करून घेतला होता . आपल्या मुलाचे रायबाचे लग्न बाजूला सारून कोंढाणा सर करण्याची मोहिम ज्यावेळी तानाजींनी आपल्या हाथी घेतली . त्यावेळी त्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यावर जाऊन, कोळ्यांचे सरदार व कोंढाण्याच्या पायथ्याशी असलेल्या, रायाजी घेरेसरनाईक यांच्या येथे तोताराम गोंधळी नावाने, जागर -गोंधळ घालून, कोळीसरदाराचे मतपरिवर्तन करून, गडाची खडान खडा माहिती मिळवून, कोंढाण्यावर चाल केली व उदयभानूशी लढतांना विरमरण पत्करले . त्या घटनेची आठवण म्हणून गोंधळी समाजातर्फे त्यांचा स्मृतीदिन हा बलिदान दिन म्हणून साजरा करण्यात येते व घराघरात त्यांना मानाचा मुजरा म्हणून अभिवादन करण्यात येत असते . अकोला येथे गोंधळी समाजाचे सुधाकर इंगोले यांचे घरी सुधाकर इंगोले, अशोक इंगोले, श्रीमती दुर्गाबाई कडोळे, सौ संगीता इंगोले यांनी नरविर तानाजी मालुसरे यांच्या फोटोचे पूजन व हारार्पण केले .

 

 




Related Posts

0 Response to "गोंधळी समाजाने केले घराघरात नरविर तानाजी मालुसरेंना अभिवादन ! "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article