उत्सव काळात श्री नृसिह सरस्वती स्वामी मंदिराला दर्शनार्थी म्हणून राज्यपालांची धावती भेट
साप्ताहिक सागर आदित्य/
उत्सव काळात श्री नृसिह सरस्वती स्वामी मंदिराला दर्शनार्थी म्हणून राज्यपालांची धावती भेट
कारंजा (लाड) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी, श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांचा उत्सव चालू असतांना, श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान श्री गुरु मंदिर कारंजा येथे दर्शनार्थी म्हणून आज दुपारी धावती भेट दिली . यावेळी श्री गुरुमंदिर विश्वस्त मंडळीनी त्यांना श्री गुरुप्रसाद सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार केला . आणि अवघ्या पाच मिनिटातच त्यांचा ताफा परती करीता रवाना झाला . परंतु यावेळी वृत्त संकलनाकरीता जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांना परवानगी नसल्यामुळे , रात्रंदिवस जीवावर उदार होऊन राबणाऱ्या पत्रकारांची नाराजी झाली . व व्यवस्थित वृत्तसंकलन होऊ शकले नाही असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे वाशीम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .
0 Response to "उत्सव काळात श्री नृसिह सरस्वती स्वामी मंदिराला दर्शनार्थी म्हणून राज्यपालांची धावती भेट"
Post a Comment