शिवकालिन गोंधळी सुभेदार नरविर तानाजी मालुसरे बलिदान दिन संपन्न !
साप्ताहिक सागर आदित्य/
शिवकालिन गोंधळी नरविर सुभेदार तानाजी मालुसरे बलिदान दिन संपन्न !
वाशिम : स्थानिक महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजातर्फे, शुक्रवार रोजी रात्री ७:०० वाजता, श्री कामाक्षादेवी संस्थान कारंजा येथे, कैकाडी समाज संघटनेचे विदर्भ सचिव तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे संचालक पांडूरंग माने यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी, सुनिल गुंठेवार, सुप्रसिद्ध गोंधळी लोककलावंत सुरेशराव हांडे, नाट्य परिषदेचे मोहित जोहरापूरकर, नंदकिशोर कव्हळकर यांचे प्रमुख उपस्थितीत, प्रमुख पाहुण्यांचे हस्ते,आद्य गोंधळी नरविर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कडोळे यांनी केले . त्यानंतर पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, नंदाकशोर कव्हळ्कर, सुनिल गुंठेवार, शेषराव पाटील इंगोले, कैलास हांडे, विजय पाटील खंडार, उमेश अनासाने, बाळकृष्ण काळे यांनी आपल्या मनोगतातून आदरांजली व्यक्त केली . याप्रसंगी कैलास हांडे, सुरेशराव हांडे , शेषराव इंगोले यांनी शिवगान प्रस्तुत केले . कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी तर आभार प्रदर्शन रोहीत महाजन यांनी केले .
0 Response to "शिवकालिन गोंधळी सुभेदार नरविर तानाजी मालुसरे बलिदान दिन संपन्न ! "
Post a Comment