जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताहांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन!
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताहांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन!
वाशिम दि.४ - शासनाच्या महत्वांक्षी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ या कार्यक्रमांतर्गत ग्रामिण भागातील प्रत्येक कुंटुबांला नळाव्दारे शुध्द व शाश्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी तसेच ग्रामीण भागात स्वच्छता चळवळ गतिमान होण्यासाठी आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ ची प्रभावी अंमलबजावणी व गती वाढविण्यासाठी जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताह राबविण्याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. या सप्ताहामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत १००% नळजोडणी झालेल्या गावांमध्ये हर घर जल घोषित ग्रामसभेचा ठराव प्रमाणपत्र, व्हिडीओ क्लिप संकेतस्थळावर नोंदविणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छ पर्यावरण तसेच सुदृढ आरोग्य आणि शुद्ध पिण्याचे पाणी या विषयावर निबंध स्पर्धांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करणे, ग्रे वॉटर व्यवस्थापनाबाबत गावांमध्ये भित्ती- चित्र रेखाटने, पाणी आणि स्वच्छता या विषयावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची बैठक आयोजित करणे, सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता ही श्रमदानाच्या माध्यमातून करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या नोंदी संकेतस्थळावर अद्यावत करणे आदी उपक्रम राबवले जात आहेत. सप्ताहातील उपक्रमांचे आयोजन करताना covid-19 आजाराबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा व सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले आहे.
0 Response to "जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताहांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन!"
Post a Comment