स्वखर्चाने देवपेठ येथील रस्त्याची दुरुस्ती
साप्ताहिक सागर आदित्य/
स्वखर्चाने देवपेठ येथील रस्त्याची दुरुस्ती
वाशिम - प्रत्येक वेळी प्रत्येक समस्येसाठी शासनावर किंवा प्रशासनावर अवलंबून राहणे गरजेचे आहे का? उत्तर आहे नाही कित्येक अशा समस्या असतात की त्या नागरिक स्वतः म्हणून निवारण करू शकतात. याचाच एक उदाहरण म्हणून आज प्रभाग क्रमांक १० वाशीम येथील लोकांनी करून दाखवला: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था देवपेठ येथे होती , त्यावेळी गोपाल जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतः सिमेंट, रेती आणि मिक्सर ची सोय लावली रवी इंगोले सर यांनी पाण्याची जवाबदारी घेतली, आनंदभाऊ सोमानी यांनी रस्ता अडवून पाणी देण्याची हमी घेतली तर दवंडे सरांनी तर रात्री उशिरापर्यंत थांबून कोणते वाहन नवीन तयार केलेल्या रस्त्यावरून जावे नाही यासाठी थंडीत बसून राहिले तसेच इतर नागरिकांनी रस्ता धुऊन घेऊन तो साफ करून पाणी देण्याची व्यवस्था करुन घेतली,या वेळी नानाभाऊ ठाकरे, बोरकर तसेच कॉम्रेड ग्रुपच्या मित्रांनी सुद्धा सहकार्य केले अशा तऱ्हेने ही एक समस्या दूर करण्यात आली.
0 Response to "स्वखर्चाने देवपेठ येथील रस्त्याची दुरुस्ती"
Post a Comment