-->

राष्ट्रवादीच्या दिरंगाईमुळे शासकिय निमशासकीय समित्याच्या स्थापनेत अडथडा..?

राष्ट्रवादीच्या दिरंगाईमुळे शासकिय निमशासकीय समित्याच्या स्थापनेत अडथडा..?


साप्ताहिक सागर आदित्य/

राष्ट्रवादीच्या दिरंगाईमुळे शासकिय निमशासकीय समित्याच्या स्थापनेत अडथडा..?                    

वाशीम - चौकशीअंती कळालेल्या विश्वसनिय माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पक्षश्रेष्ठीकडे, "मला विश्वासात घेतल्याशिवाय कृपया शासकिय निमशासकिय समित्याचे गठन न करण्याची " गळ घातल्यामुळे, पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांचेद्वारे गठन होणाऱ्या शासकिय निमशासकिय समिती जाहीर होण्यास विलंब लागत असल्याचे विश्वसनिय कटूसत्य असल्याचे कळते . मिळालेल्या माहितीवरून महाविकास आघाडीच्या राज्यशासनात, शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी असे तिन पक्ष सहभागी असल्यामुळे, शासकिय निमशासकिय समिती गठन करतांना वाशीम जिल्ह्याकरीता, समिती सदस्यांच्या नेमणूका करतांना 60 - 20 - 20 असा फॉर्म्युला ठरला असल्याचे कळते . म्हणजेच फॉर्म्युलानुसार 60 % जागा शिवसेनेच्या वाट्याला तर उर्वरीत 20 % काँग्रेस आणि 20 % राष्ट्रवादीच्या वाट्याला असे सुत्र ठरले असल्याचे बोलले जाते . परंतु अद्यापपावेतो राष्ट्रवादी पक्षाकडून समिती पदाधिकारी जागेकरीता म्हणजेच सदस्यांकरीता नावे न गेल्यामुळे शासकिय निमशासकिय समित्याचे गठन लांबनीवर पडल्याचे दिसत आहे . राज्यात सरकार स्थापन होऊन अडीच वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापपावेतो समिती स्थापन न झाल्यामुळे विकासाची कामे मागे पडली असल्याचे वास्तव आहे . असे गोपनिय सुत्राकडून कळत असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .

 

 




Related Posts

0 Response to "राष्ट्रवादीच्या दिरंगाईमुळे शासकिय निमशासकीय समित्याच्या स्थापनेत अडथडा..? "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article