डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा सोनखास येथे सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य/
वंचित बहुजन आघाडी चे पश्चिम विदर्भ पदी सिद्धार्थ देवळे यांची तर महासचिवपदी सोनाजी इंगळे झाल्याबद्दल सत्कार
वाशिम - वंचित बहुजन आघाडी चे पश्चिम विदर्भ पदी नियुक्ती झाल्यामुळे डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, सोबतच वाशिम जिल्हा महासचिवपदी सोनाजी इंगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीची वाशिम जिल्हयात सत्ता आल्यास सर्व धर्मातील लोकांना योग्य तो न्याय मिळेल तसेच जिल्हयामध्ये एकही चुकीची अत्रोसिटी (Atrocity) केस दाखल होणार नाही याची ग्वाही कार्यक्रमात देण्यात आली आणि सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करीन व सदैव जनसेवा करण्याचे प्रयत्न करीन. कार्यक्रमाला सिद्धार्थ देवळे , दिलीप भगत खोडके, पंचायत समिती सदस्य व या वेळी असंख्य कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन बंडू सरकटे यांनी केले.
0 Response to "डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा सोनखास येथे सत्कार"
Post a Comment