नळ योजनेच्या सक्षमीकरणासाठी स्वमालकीची भावना आवश्यक: माजी मंत्री सुभाष ठाकरे
साप्ताहिक सागर आदित्य/
नळ योजनेच्या सक्षमीकरणासाठी स्वमालकीची भावना आवश्यक: माजी मंत्री सुभाष ठाकरे
वाशिम - कोणत्याही गावातील नळ पाणी पुरवठा योजना दीर्घकाळ टीकण्यासाठी लोकांमध्ये त्या योजनेविषयी स्वमालकीची भावना तयार होणे आवश्यक असल्याचे मत माजीमंत्री सुभाष ठाकरे यांनी व्यक्त केले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, राम ठाकरे, स्वच्छ भारत मिशनचे प्रफुल्ल काळे, जल जीवन मिशनचे शंकर आंबेकर, कृषी विकास संस्थेचे सीईओ अमित नाफडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जल जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षणाचा एक भाग म्हणुन कासोळा (ता.मंगरुळपीर) येथील पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी अभ्यास सहलीनिमित्त बाहेरगावातुन आलेल्या प्रशिक्षणार्थींना ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दित केलेल्या पाणी पुरवठा योजना व जल संधारणाच्या कामांना उजाळा दिला.
जल जीवन मिशन प्रशिक्षणादरम्यान अभ्यास सहल:
कृषी विकास व ग्रामिण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने वाशिम, मालेगाव व रिसोड तालुक्यातील 15 ग्राम पंचायतीमधील 75 प्रतिनिधिंना प्रशिणादरम्यान कासोळा येथे अभ्याय सहलीचे आयोजन केले होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे आणि शाखा अभियंता महेश कान्हेरकर यांनी कासोळा गावाच्या पाणी पुरवठा योजनेची तांत्रिक माहिती दिली.
मौजे कसोळा येथील एकुण कुटूंब संख्या 607 असुन पूर्ण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. गावाला प्रती माणसी प्रति दिन 55 लिटर प्रमाणे दररोज पाणी पुरवठा होतो. गाव हागणदारीमुक्त आहे. या गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा व ईतर बाबींचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील 15 गावातील प्रशिक्षणार्थींनी कासोळा या गावाला भेट दिली. गावाची पाहणी गेली, सांडपाणी व कनकचर्याची व्यवस्था, गावातील सार्वजनिक संस्था यांची पाहणी केली. शिवार फेरी करुन गावाचा नकाशा काढला. लोक सहभागीय मुल्यांकनाच्या माध्यमातुन गावाचा पाणी व स्वच्छता याबाबत अभ्यास करण्यात आला.
गावासाठी वाचनालयाची मागणी मंजुर:
माणसाच्या विकासात शिक्षणाची भुमिका महत्वाची असुन गावातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी गावात सुसज्ज ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी गावातील जेष्ठ नागरिक मधुकर लाडके यांनी या कार्यक्रमात केली. याला तत्काळ प्रतिसाद देऊन माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी गावातील जगदंबा मंदिराशेजारील हाॅलमध्ये ग्रंथालय सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक गव्हाणे यांनी केले.
0 Response to "नळ योजनेच्या सक्षमीकरणासाठी स्वमालकीची भावना आवश्यक: माजी मंत्री सुभाष ठाकरे"
Post a Comment