-->

गत तिन महिन्यांपासून कलाकाराचे मानधन रखडले.

गत तिन महिन्यांपासून कलाकाराचे मानधन रखडले.


साप्ताहिक सागर आदित्य/

गत तिन महिन्यांपासून कलाकाराचे मानधन रखडले.                           

वाशीम : सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाकडून गेल्या तिन महिन्यांपासून, ज्येष्ठ वयोवृद्ध साहित्यीक कलावंताचे मानधन त्यांना पाठविण्यात न आल्यामुळे वृद्धापकाळी कलावंतावर उपासमारीची वेळ आल्याचे वास्तव आहे . मिळालेल्या वृत्तानुसार, सौ तुळसाबाई चौधरी, विश्वनाथ इंगोले, रामबकस डेंडूळे, शिवमंगल आप्पा राऊत, इंदिराबाई मात्रे, अजाब इंगोले यांनी सांगीतले की, "गेल्या ऑक्टोबर महिन्यात दिपावलीला आम्हाला मानधन मिळाले होते . परंतु त्यानंतर नोहेंबर डिसेंबर जाऊन नविन वर्ष उजाडले . जानेवारी महिना सुद्धा संपला . परंतु सांस्कृतिक विभागाने अद्यापही तिन महिन्याचे मानधन न पाठविल्यामुळे, वृद्धापकाळी तुटपुंज्या का होईना परंतु, मानधनावर अवलंबून असणाऱ्या आम्हा कलावंताची उपासमार होत आहे . तरी शासनाने आम्हाला दर महिन्याला वेळेवर मानधन देण्याची तरतुद करावी . " अशी मागणी मानधन लाभार्थी कलावंतानी केली आहे .




Related Posts

0 Response to "गत तिन महिन्यांपासून कलाकाराचे मानधन रखडले. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article