कारंजा पत्रकार मंचाच्या वतिने, मुकनायक पत्रकार दिन साजरा!
साप्ताहिक सागर आदित्य/
कारंजा पत्रकार मंचाच्या वतिने, मुकनायक पत्रकार दिन साजरा!
कारंजा : कारंजा पत्रकार मंच आणि विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत, बायपासवरील कारंजा पत्रकार मंच कार्यालयात, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून, १०२ वर्षापूर्वीच्या, मुकनायक पाक्षिकाच्या स्थापनेला उजाळा देत, मुकनायक पञकार दिन साजरा केला.
या मुकनायक पाक्षिका मधुन खरी जन जागृती केली बहुजनाचे हिताकरिता बाबासाहेबांनी दाखविलेल्या, अन्याय अत्याचाराच्या खात्म्याकरीता पत्रकारीतेच्या मार्गाने, निर्भिडपणे चालण्याकरीता, त्यांना अभिप्रेत असलेली पत्रकारीता निरंतर चालविण्याचा निर्धार करीत, दिनांक ३१ जानेवारी मुकनायक नावाचे पाक्षिक काढले होते त्या निमीत्याने व खर्या अर्थाने ३१ जानेवारी हाच पत्रकार दिन साजरा केला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, विलासभाउ राऊत होते . तर प्रमुख उपस्थितीमध्ये कारंजा पत्रकार मंचाचे अध्यक्ष : दिलीप पाटील रोकडे, प्रमुख अतिथी वैदर्भिय नाथ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, अ भा नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबई सदस्य नंदकिशोर कव्हळकर, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष : आरिफभाई पोपटे, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे अबरार भाई विजय गागरे किरण भाउ क्षार चांदभाई मुन्नीवाले सुनील फुलारी डिगांबर सोनोने गणेश बागडे हाफीजभाई श्रीकांत भाके रमेश देशमुख विजय खंडार राजु शामसुंदर महमंद मुन्नीवाले हे होते . यावेळी प्रास्ताविक संजय कडोळे यांनी केले तर दिलीप पाटील रोकडे,एकनाथ पवार, नंदकिशोर कव्हळकर, जिनवर तायडे यांनी आपले विचार मांडले . पत्रकार मंचाचे सर्व सभासद .उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महमंद मुन्नीवाले यांनी मानले.
0 Response to "कारंजा पत्रकार मंचाच्या वतिने, मुकनायक पत्रकार दिन साजरा! "
Post a Comment