सरदार वल्लभभाई पटेल न. प. शाळा येथे जलशक्ती आभियान २०२२ आयोजित
साप्ताहिक सागर आदित्य/
पाणी हे जीवनरत्न असून जल व्यवस्थापन नवीन पिढीचे जीवन
वाशिम - स्थानिक वाशिम येथे सरदार वल्लभभाई पटेल न. प. शाळा येथे राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक शिक्षण बहु. संस्था केकतउमरा व नेहरू युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलशक्ती आभियान २०२२ यांच्या वतीने जल शक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या कडून संपूर्ण देश भर राबविले जात आहे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करुन जलशक्ती अभियानामध्ये मनापासून सहभागी व्हा. पाणी ही अनमोल संपत्ती आहे. असे माणून प्रत्येक जण पाण्याचा वापर करेल. प्रत्येक कुटूंबिय, मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी आणि पाणी वाया न घालण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करण्यात येईल. तसेच गेली अनेक वर्षांपासून राजा प्रसेनजीत संस्था व नेहरू युवा मंडळ यांच्या वतीने गावोगावी जिल्हामधी अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवून पथनाट रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, जल साक्षरता, जल व्यवस्थापन, बोरी बंधारा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, चॅट द रेन, पाणी आडवा पाणी जिरवा, यास अनेक विषयावर जलजागृती करण्यात येत आहे. या आयोजित जल व्यवस्थापन मार्गदर्शन शाळेमधून विद्यार्थ्यांना पाण्या विषय माहिती सागुण पाण्याचा वापर कसा करायचा आहे. या करिता आपण आपल्या घरी जाऊन आई-बाबा आपल्या परिवाराला काठ कसरिने पाण्याचा उपयोग केला पाहिजे आसे सांगितले. यावेळी उपस्थित पंचायत समिती वाशिम जल सेवक प्रदिप पट्टेबहादुर, कु.मयूरी प्रवीण अवताडे ,कु प्राची एकनाथ ताजने, शिमा कांबळे, पायल सरकटे,पल्लवी डाखोरे, प्रतिक्ष भगत,साक्षी झाटे,अक्षय नवघरे, अशांत कोकाटे, अशोक खुळे, अल्ताफ चौधरी, विजयकुमार राऊत, ओम साखरकर,अजय अकोलकर, हर्षद घुगे,सदानंद मुकाडे, व न.प. सरदार वल्लभभाई पटेल नगरपरिषद शाळा वाशिम येथील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षिका व श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील गटकार्य करीत विद्यार्थी व राजा प्रसेनजित संस्था नेहरू युवा मंडळ सदस्य उपस्थित होते.
0 Response to "सरदार वल्लभभाई पटेल न. प. शाळा येथे जलशक्ती आभियान २०२२ आयोजित"
Post a Comment