श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्य तर्फे स्वच्छता विषयी ग्रामीण शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत भाग १ मधिल विद्यार्थ्यांनी ग्रामीण शिबीर कार्याच्या माध्यमातुन परिसार स्वच्छता विषयी ग्राम जांभरुण परांडे येथे रेली चे आयोजन केले व त्या दरम्यान पथनाट्य देखील सादर केले तसेच महिला सक्षमिकरणाकरिता उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटातील महिलांकरीता मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित केला.या दरम्यन उमेद MSRLM अंतर्गत पंचायत समिती प्रभाग समन्वयक भाग्यश्री आडगुलवाड मॅडम उपस्थित हत्या. त्याचबरोबर गावातील सरपंच वंदना चव्हाण, पोलिस पाटील गिता मोहळे, CRP दिपालि मोहळे, जिल्हा परिषद मुख्याध्यापक अशोक बोरकर सर व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. श्री सरस्वती समाजकार्य विद्यालयातील विद्यार्थी कु. उन्नती डोंगरे, कु. हर्षदा जाधव , कु. राजकन्य मैदकर, कु.शीतल पाईकराव, कु. स्वाती खंदारे, किरन गोरे, ऋषिकेश खंडारे, शुभम धुळे, नरेश पठाडे, विकास उंदरे, यांनी संपूर्ण आयोजन व नियोजन केले होते.
0 Response to "श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील समाजकार्य तर्फे स्वच्छता विषयी ग्रामीण शिबीर "
Post a Comment