दलालांपासून कलावंतानी सावध होणे गरजेचे
साप्ताहिक सागर आदित्य/
दलालांपासून कलावंतानी सावध होणे गरजेचे
वाशीम: काही राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यानी आपले खिसे भरण्याकरीता जिल्ह्यातील कलावंतांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु केला आहे . हे कार्यकर्ते, आपल्याच पक्षातील कार्यकर्त्याना व बोगस कलावंताना मानधन सुरु करण्याचे आमिष दाखवून आपल्या राजकिय पक्षात, कलावंत समिती किंवा सांस्कृतिक विभाग असल्याचे सांगून त्यांची नोंदनी करून घेऊन, तुम्हाला आम्ही मानधन सुरु करून देतो अशी फसवणूक करून, खेडोपाडी - गावोगावी वस्त्या पाड्यावरील भजनी मंडळ सदस्यांकडून शे दोनशे रुपये लुबाडीत आहेत . त्यामुळे त्यांच्या बोगस प्रचाराला बळी पडून, मिथ्या स्वप्ने पहाणाऱ्या नागरीकांना कळविण्यात येते की, सदरहु साहित्यीक कलाकार मानधन योजना ही ज्या लोककलावंताचा उदरनिर्वाह लोककलेच्या भरवशावर अवलंबून आहे अशाच ज्येष्ठ म्हणजे वयोवृद्ध कलाकारा करीता ही योजना असून त्यासाठी लाभार्थी कलाकाराकडे पंधरा ते विस वर्षापूर्वीचे लोककलेचे साक्षी पुरावे म्हणजे कला सादर करतांनाचे छायाचित्र, त्यावेळी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी, तुम्हाला मिळालेले पुरस्कार आणि प्रमाणपत्र तसेच तुम्ही दरवर्षी करीत असलेल्या कलेच्या कार्यक्रमाचे प्रमाणपत्र, फोटो, बातम्या, उत्पन्नाचा दाखला, डोमेसिअल सर्टिफिकेट आणि १०० रु च्या प्रतिज्ञापत्रावर नोटरी , आमदाराचे शिफारसपत्र इत्यादी कागदपत्रांची मुळ फाईल असणे आवश्यक आहे . आणि सदर्हु मानधन मिळविण्याकरीता कलावंतानी कोणत्याही दलालाची मदत न घेता थेट पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांशीच संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्ह्यातील लोककलावंता करीता रितसर न्याय हक्काने झगडणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, उमेश अनासाने, नंदकिशोर कव्हळकर यांनी केले आहे . तसेच सदरहु योजना ही केवळ कलावंता करीता असल्यामुळे कोणत्याही समाजसेवक व राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांना याचा लाभ घेताच येऊ शकत नाही . त्यामुळे समाजसेवक व राजकिय कार्यकर्ते यांनी कलाकाराच्या मानधन योजनेवर डोळा ठेवू नये असे सुद्धा त्यांनी सुचवले आहे.
0 Response to "दलालांपासून कलावंतानी सावध होणे गरजेचे "
Post a Comment