आ . आमित झनक यांचे हस्ते,कांग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला कारंजा तालुक्यात सुरवात
साप्ताहिक सागर आदित्य/
आ. आमित झनक यांचे हस्ते,कांग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला कारंजा तालुक्यात सुरवात
कारंजा (लाड )- वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत कारंजा तालुका व शहर डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अमितभाऊ झनक ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली.
ह्यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ह्यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रास्ताविक करतांना आ . अमित भाऊ झनक म्हणाले की, " कांग्रेस चे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नोंदणी अभियानाला राज्यात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली. कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर डिजीटल सदस्य नोंदणी करून येणाऱ्या काळात कांग्रेस पार्टी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे " असे आवाहन आ. अमितभाऊ झनक ह्यांनी केले. ह्यावेळी डिजिटल सदस्य नोंदणी कशी करावी ? ह्याबद्दल ची सविस्तर माहिती प्रा. संतोष भाऊ दिवटे व देशमुख साहेबांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. ह्यावेळी दिलीप भोजराज , अॅड संदेश जैन जिंतुरकर, अॅड. वैभव ढगे , दिलीपभाऊ मोहनावाले , राज चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
ह्या कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील बहुसंख्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "आ . आमित झनक यांचे हस्ते,कांग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाला कारंजा तालुक्यात सुरवात"
Post a Comment