श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्काऊट विद्यार्थ्यांचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य/
श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्काऊट विद्यार्थ्यांचा सत्कार
मालेगाव : राज्य प्रशिक्षण रामटेक केंद्र , नागार्जुन ( नागपूर ) झालेल्या राष्ट्रपती स्काऊट पूर्व परीक्षा 2022 परीक्षेत श्री सरस्वती विद्या मंदिर शाळा , मालेगाव येथे चे विध्यार्थी मयुर सुभाष वानखेडे , हर्षद माधव नवघरे , चेतन गजानन नवघरे , गणेश विष्णू नवघरे संपादित करीत यांनी यश आपल्या शाळेसह जिल्हाचेही नाव उज्वल केले आहे . यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्काराचे आयोजन मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाकडून करण्यात आले होते . या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार बोरकर व शिक्षक संदीप खडसे , विनोद शिंदे , प्रवीण इंगळे , उमेश वाघ , नंदकिशोर घुगे , गजानन कव्हर , सचिन चतरकर हे उपस्थित होते दि 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रपती स्काऊट पूर्व परीक्षा नागार्जुन रामटेक ( नागपूर ) परीक्षेत वाशीम जिल्हाचे नेतृत्व करत विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केले . जिल्ह्यासह , पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक होत आहे . या सर्व यशाचे श्रेय विध्यार्थ्यांनी मुख्याध्यापक , प्रविणकुमार बोरकर सर्व शिक्षक वृंद श्री सरस्वती विद्या मंदीर प्राथ . शाळा मालेगाव व त्यांच्या आई वडिलांना देत आहेत . या परीक्षेच्या तयारी व अथक परिश्रम स्काऊट मास्टर सचिन चतरकर यांनी घेतले आहे .
0 Response to "श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्काऊट विद्यार्थ्यांचा सत्कार "
Post a Comment