
आपल्या लाडक्या दिदीला, संगीतप्रेमी कारंजेकरांनी एक"पणती" म्हणजेच "दिप" प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण करावी !!!
साप्ताहिक सागर आदित्य/
आपल्या लाडक्या दिदीला, संगीतप्रेमी कारंजेकरांनी एक"पणती" म्हणजेच "दिप" प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण करावी .!!!
कारंजा(लाड): सर्वत्र कारंजेकर संगीतप्रेमी बंधु भगीनीना कळविण्यात येते की, साक्षात सरस्वती, भारताचा स्वाभिमान असलेल्या स्वरसम्राज्ञी - गानकोकीळा भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांचे रविवारी दि . ६ फेब्रुवारीला दुःखद निधन झाले आहे . त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, आपण कारंजेकरही त्यामध्ये सहभागी आहोत . आणि म्हणूनच, लोककलावंत तथा पत्रकार संजय कडोळे यांच्या संकल्पनेतून त्यांना सर्वच सांस्कृतिक संस्था आणि संगीतप्रेमी कारंजेकरांकडून त्यांना शांतता - शिस्त व संयम ठेवून,मौन्य भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ठिक सहा वाजता, आझाद हिंद व्यायाम शाळेच्या सहकार्याने जुन्या विवेकानंद हिंदी हायस्कूल जवळ, नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात, पोहा वेस येथे ठरविला असून, त्याकरीता इच्छुक कारंजेकर बंधूभगीनी यांनी, कोरोना नियमावलीचे पालन करीत, मुखोच्छादन /मास्क लावूनच यावे व सोबत"एक दिव्याची पणती " घेऊन यावे आणि दिपप्रज्वलन करून मौन्य श्रध्दांजली करीता अचूक वेळेवर उपस्थित रहावे . व कोणत्याही प्रकारची गर्दी न करता मौन्य राहून आपल्या लाडक्या लतादिदीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन अ भा . नाट्य परिषद मुंबई /कारंजा , द्वारकामाई संगीत मैफिल कारंजा, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद कारंजा, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, ईरो फिल्मस एन्ड म्युझिक कारंजा आझाद हिन्द व्यायाम शाळा व समस्त सांस्कृतिक संस्था तथा संगीतप्रेमी कारंजेकरांचे वतीने, संयोजक डॉ कुंदन श्यामसुंदर, नंदकिशोर कव्हळकर, संजय कडोळे, ईम्तियाज लुलानीया, रोमिल लाठीया, श्यामभाऊ वानखडे, गोपाल खाडे,श्रीकांत भाके, ज्ञानेश्वर खंडारे , पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, डॉ ज्ञानेश्वर गरड,सौ . छायाताई श्यामसुंदर, सौ वंदना खंडारे, सौ . छायाताई गावंडे, प्रणिता दसरे तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे विजय खंडार, उमेश अनासाने आदींनी केले आहे .
0 Response to "आपल्या लाडक्या दिदीला, संगीतप्रेमी कारंजेकरांनी एक"पणती" म्हणजेच "दिप" प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण करावी !!! "
Post a Comment