-->

जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम  मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी हाती खराटा घेऊन केली स्वच्छता.

जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी हाती खराटा घेऊन केली स्वच्छता.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी हाती खराटा घेऊन केली स्वच्छता.


जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात (आज दिनांक 8 रोजी) जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे सीईओ वाघमारे यांनी स्वत: हाती खराटा घेऊन परिसराची स्वच्छता केली. सोबतच सर्व विभाग प्रमुख यांनीही यामध्ये सक्रीय सहभाग घेतला. 

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिनकर जाधव, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटविकास अधिकारी उदय जाधव यांनीही  यावेळी हाती खराटा घेऊन श्रमदान केले.

शासनामध्ये कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच जिल्हा परिषद इमारतीची पाहणी केली व दुसऱ्या दिवशी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. गुरुवार दिनांक 8 रोजी सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एकत्र आले. सुरुवातीलाच हातात झाडू घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी विभाग प्रमुखांसह जिल्हा परिषद समोरील परिसर स्वच्छ केला. त्यानंतर सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांना  स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेचा परिसर विभागून देण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी सुमारे एक ते दिड तास जिल्हा परिषद परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

0 Response to "जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी हाती खराटा घेऊन केली स्वच्छता."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article