-->

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज  > तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधी मात्रा  > अंगणवाडी सेविका, आशाताईंचे मदत

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज > तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधी मात्रा > अंगणवाडी सेविका, आशाताईंचे मदत



 साप्ताहिक सागर आदित्य 

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज

> तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधी मात्रा

> अंगणवाडी सेविका, आशाताईंचे मदत


वाशिम,  : जिलह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप जंतनाशक गोळीची मात्रा औषध मात्रा दिल्या जाणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.


जिल्ह्यातील एकूण १ हजार ५९९ शाळा, ४८ महाविद्यालय व १ हजार १६२ अंगणवाडी केंद्रातील एक ते १९ वर्षे वयोगटातील व शाळाबाह्य मुले-मुली अशा एकूण ३ लाख ३९ हजार ३८३ विद्यार्थ्यांना जंतनाशक औषध, जंतनाशक गोळी (अलबेंडाजोल)ची मात्रा दिल्या जाणार आहे. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील सर्व मुलामुलींनी व विद्यार्थ्यांनी घ्यावा. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्या माध्यमातून जंतनाशक गोळीचे वाटप केल्या जाणार आहे. पालकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी केले आहे.


राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्दिष्ट हे एक ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतदोषामुळे बालकांचे शिक्षण व दीर्घकालीन कार्यक्षमता यावर कोणता परिणाम होतो. तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास बालक सतत आजारी पडते व त्याला थकवा जाणवतो. त्यामुळे त्याची अभ्यासातील एकाग्रता कमी होते व ते शाळेत वारंवार गैरहजर राहते. जंत संसर्गामुळे बालकाचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो ज्याचा दुष्परिणाम मोठेपणी त्याच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर व अर्थार्जनावर होऊ शकतो. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


0 Response to "राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज > तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधी मात्रा > अंगणवाडी सेविका, आशाताईंचे मदत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article