-->

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन


वाशिम, : राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात सूचना व हरकती दि. ८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामागीरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. 


क्रीडा संचालनालयाच्या https://sports.maharastra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह नमूद कालावधीमध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत हरकती सादर करावयाच्या आहेत.


त्यानुसार विहित नमुन्यात सूचना व हरकती सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे. विहित नमुन्यासाठी संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घ्यावा, असे आवाहन वाशिमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी, लता गुप्ता यांनी केले आहे. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणारा अहवाल हा प्राथमिक छाननी अहवाल असून तो अंतिम नाही, असेही त्यांनी कळविले आहे.


0 Response to "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भात सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article