
एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा!
साप्ताहिक सागर आदित्य
एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा!
देशातील रेकॉर्ड ब्रेक महाकुंभ भूतो.. न भविष्यती.आंतरवली सराटी
एवढा मोठा सोहळा इतिहासात पहिल्यांदाच..
ही गर्दी आहे..
अजुन चारही मुख्य रस्त्याने मागे ३० किमी ट्रॅफिक जाम झालेली आहे. समोर जायला रस्ताच भेटत नाही. सभा स्थळावरून अजून किमान २० पट लोक बाहेर आहे..
मोठमोठ्या नेत्यांनी स्वप्नातही पाहिली नसेल अशी गर्दी!
मोठमोठ्या सभा गाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इतिहासापासून ते आजपर्यंत कितीही लोकप्रिय असलेल्या नेत्याने कधी प्रत्यक्ष तर सोडा स्वप्नातही जेवढी गर्दी एका वेळी एका ठिकाणी पाहिली नसेल तेवढी गर्दी आज एक अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या मराठा तरुणाच्या शब्दावर सराटी आंतरवाली सारख्या अतिशय छोट्या खेडेगावात जमा झाल्याचे आज अवघ्या जगाने अनुभवले!त्यानिमित्ताने मराठ्यांचा जनसागर आणि शक्ती जगाला पाहायला भेटली!
सभेचे स्थान म्हटलं तर जगाच्या नकाशात शोधूनही सापडणार नाही एवढे छोटे गाव! नेता म्हटलं तर साधी ग्रामपंचायत ही लढवण्याचा अनुभव नसलेला,पत्राच्या घरात राहून दुचाकी वर खेडोपाडी फिरून मराठा तरुणांना जागृत करण्यासाठी वणवण फिरणारा एक अतिशय सामान्य देहयष्टी असणारा,अगदी डोळ्यात न भरणारा तरुण- जरांगे पाटील!!
तरीही एवढी अफाट गर्दी,अचाट लोकप्रियता! कारण एकच!! समाजाच्या तळमळीच्या प्रश्नाला हात घातला,विषय लाऊन धरला,प्रामाणिकपणे लढा सुरू ठेवला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या समाजाशी बांधिलकी जपत कोणाच्या बापाला ही मॅनेज न होता सरकारला धडकी भरवणारी मराठ्यांची विराट सभा आयोजित केली आणि खऱ्या अर्थाने सिद्ध केलं.
0 Response to "एक मराठा लाख मराठा नाही तर एक मराठा कोटी मराठा!"
Post a Comment