-->

श्री रामांना त्यांच्या प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त

श्री रामांना त्यांच्या प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त

 


आमचे_राम_सिताराम


भारतात शेकडो प्रकारचे रामायण आहेत.त्यामुळे रामांची व त्यांच्या चरित्राची मांडणी प्रत्येकाने आप-आपल्या मनोभुमिकेतून केली आहे.

त्यामुळे रामांकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्ती परत्वे बदलताना दिसतो. परंतू....


आमचे राम....सत्तापिपासू नाहीत.


म्हणून ते राजपाटाला लाथ मारून, अनुज भावाला राज सिंहासनावर बसवतात आणि वनवासाला निघून जातात.


आमचे राम... कुटूंबवत्सल आहेत.


म्हणूनच ते राज सिंहासनाची लालसा न करता वडीलांच्या आज्ञेनुसार वनवास पत्करतात व कौटूंबिक कलह संपूष्टात आणतात.


आमचे राम.... चैनी, विलासी नाहीत.


म्हणूनच ते वनवासात जाताना राजवस्त्र,अलंकार,रथ,दास-दासी इत्यादी राजवैभव सोबत घेत नाहीत.


आमचे राम.... मानवतावादी आहेत.


म्हणून ते तत्कालीन धर्म व्यवस्थेनी अस्पृश्य ठरवलेल्या शबरी माईने दिलेली बोरे खातात.


आमचे राम....अन्याय संहारक आहेत.


म्हणून ते पृथ्वी निःक्षत्रिय करणाऱ्या परशुरामाला पराजीत करतात.


आमचे राम....आदर्श पती आहेत.


म्हणून अपहरण केलेल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी ते घनघोर संघर्ष करतात.


आमचे राम... सत्ताकांक्षी नाहीत.


म्हणूनच ते लंका जिंकल्या नंतर लंकेचे राज्य बिभिषणाकडे सोपवतात.


आमचे राम.... प्रजाहितदक्ष आहेत.


म्हणून ते प्रजेचे रक्षण, शिक्षण, पोषण इत्यादींची चोख व्यवस्था करतात.


वनवास रामांनी स्वेच्छेनी पत्करला होता. सितामाईंना तो बंधनकारक नव्हता.

तरीही जीवन सहचारिणी म्हणून त्या रामांची अखंड सोबत करतात आणि राम देखील....

पत्नीच्या त्यागाचे स्मरण ठेवतात आणि सितामाईंची बंदिवासातून मुक्तता करतात.

    

राम-सिता यांचा त्याग,संघर्ष आणि त्यांचे परस्पर प्रेम,समर्पण सर्वांसाठी दिशादर्शक आहे.म्हणून आमचे राम हे फक्त श्री राम नाहीत. तर ते सिताराम आहेत.


निकोप कौटूंबिक जीवनासाठी राम व सिता ही दोन्ही पात्रे दिशादर्शक ठरू शकतात.


म्हणून एकट्या रामांचा जयघोष करण्यापेक्षा 'जय सिताराम' हा दोघांचा जयघोष अधिक समर्पक व संयुक्तिक वाटतो.


 श्री रामांना त्यांच्या प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त 




0 Response to "श्री रामांना त्यांच्या प्रतिमेच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article