-->

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला

 


साप्ताहिक सागर आदित्य 

क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला 

वाशिम  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील महामार्ग पॅकेज क्रमांक ५ मधील मालेगाव तालुक्यातील साखळी क्रमांक २१९ /२३३ वरील वाहनांसाठी उन्नत मार्गाच्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने काँक्रीट गर्डर पुलावर ठेवण्याचे काम २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू असताना क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप होऊन गर्डर पूर्ण चढण्यापूर्वीच जमिनीवर कोसळले.  पूल कोसळला नसून दुर्दैवाने क्रेन घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जीवित व वित्तीय हानी झाली नसल्याची माहिती अमरावती येथील ना.मु.शि.द्रु.म.(मर्या) शिबिर कार्यालयाचे मुख्य अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी एका निवेदनातून दिली.







Related Posts

0 Response to "क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप झाल्याने गर्डर कोसळला "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article