-->

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात

 


साप्ताहिक सागर आदित्य 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात


       वाशिम,  :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 11.55 वाजता मुंबई येथून विमानाने अकोला विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.05 वाजता हेलीकॉप्टरने वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील वसंतनगर (पोहरादेवी) कडे प्रयाण करतील. दुपारी 12.35 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) येथील हेलीपॅडवर हेलीकॉप्टरने आगमन. दुपारी 12.40 वाजता मोटारीने पोहरागडकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता पोहरागड येथे आगमन व दर्शनाकरीता राखीव. दुपारी 1.10 वाजता मोटारीने सभा स्थळाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता सभास्थळ येथे आगमन व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित ओबीसी जागर यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 2.45 वाजता वसंतनगर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता वसंतनगर (पोहरादेवी) हेलीपॅड येथे आगमन. दुपारी 3 वाजता हेलीकॉप्टरने अकोला विमानतळाकडे प्रयाण करतील.



केंद्रीय वित्त राज्यमंञी डॉ.भागवत कराड यांचा जिल्हा दौरा 


वाशिम, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी १२.३० वाजता वसंतनगर येथील हेलिपॅड येथे आगमन.दुपारी १२.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत पोहरादेवी येथे राखीव,दुपारी २.४५ वाजता पोहरादेवी येथुन मालेगावकडे प्रयाण,दुपारी ३.४५ वाजता अरुणराव सांगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.



राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा जिल्हा दौरा


वाशिम  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष (केंद्रीय कॅबिनेट मंत्री दर्जा) शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सकाळी ११.३० वाजता नागपूर येथुन वर्धा - यवतमाळमार्गे पोहरादेवी येथे आगमन व जागर यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी २ वाजता पोहरादेवी येथुन चंद्रपूरकडे प्रयाण करतील.


इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे 13 ऑक्टोबरला जिल्हयात 

 

वाशिम,  गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह,वाशिम येथे आगमन व राखीव,सकाळी 8 वाजता भाजपा कार्यालय येथे मान्यवरांच्या भेटी ,सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांची पत्रकार परिषद .दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथुन पोहरादेवीकडे प्रयाण.दुपारी 1 वाजता पोहरादेवी येथे आगमन व मेळाव्यास उपस्थित राहून जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील समारोपीय कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहतील. सोईनूसार पोहरादेवी येथुन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0 Response to "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 ऑक्टोबर रोजी जिल्हयात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article