-->

जिल्हा परिषद परिसरात उमेद बचत गटाचे विक्री केंद्र!

जिल्हा परिषद परिसरात उमेद बचत गटाचे विक्री केंद्र!



 साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषद परिसरात उमेद बचत गटाचे विक्री केंद्र!

विविध खाद्यपदार्थ व वस्तुंची होणार विक्री.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापीत बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादनाची विक्री व प्रचार प्रसिद्धी (मार्केटिंग) व्हावी या उद्देशाने  जिल्हा स्तरीय विक्री केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या समोरील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या  जिल्हा  स्तरीय डेमो हाउस मधे सदर केंद्र सरु करण्यात आले असुन याला भेट दुऊन लाभ घ्यावा तसेच बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढवावा असे आवाहनजि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.


"जिल्हा स्तरीय विक्री केंद्र शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून सर्व नागरिकांनी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील महिलाच्या सक्षमीकरणकरीता चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा व उमेद अभियानातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू,उत्पादनाची जिल्हा विक्री केंद्र जिल्हा परिषद परिसर येथून जास्तीत जास्त खरेदी करावी व बचत गटातील माता भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा."

-  चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष, जि.प. वाशिम

(फोटो)

-----

"उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापीत बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादनाची विक्री या जिल्हास्तरीय विक्री केंद्रातून होत असून सर्व नागरिक व शासकीय विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आव्हान करण्यात येते कि बचत गटातील महिला सक्षमीकरणाचा एक भाग व उपक्रम म्हणून त्यांनी तयार केलेल्या वस्तूची व उत्पादनाची या जिल्हास्तरीय विक्री केंद्रातून जास्तीत जास्त खरेदी करून महिलांना प्रोत्साहित करून उमेद अभियान यशस्वी करावे!"

-   वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. 

(फोटो)

----

केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास योजनाच्या प्रचार प्रसिद्धी करीता जिल्हा स्तरीय डेमो हाऊसची निर्मिती केलेली असून या डेमो हाउस च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व पात्र लाभार्थ्यापर्यंत विविध आवास योजनांची माहिती पोहचविणे हा शासनाचा उद्देश आहे.

                या जिल्हा स्तरीय विक्री केंद्र मध्ये बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तू विक्री करीता ठेवण्यात आलेल्या आहे त्यात प्रामुख्याने खाद्य पदार्थानमध्ये घरगुती पद्धतीने व सेंद्रिय पद्धतीचे तयार केलेले,हळद,तिखट,मिर्च मसाले,विविध प्रकारच्या डाळी,लोणचे,पापड,गोडंबी,घरगुती पद्धतीने तयार केलेला पेढा व दसरा दिवाळी करीता लागणारे विविध खाद्यपदार्थ व वस्तू येथे विक्री करीता उपलब्ध आहेत.

        तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा स्तरीय विक्री केंद्रामधून जास्तीत जास्त खाद्यपदार्थ व वस्तूची खरेदी करून महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी कार्यान्वित असलेले उमेद अभियानाला सहकार्य करुन यशस्वी करण्याचे आवाहनजिल्हा ग्रामिणविकास यंत्रणाजि. प. वाशिमचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले आहे.


0 Response to "जिल्हा परिषद परिसरात उमेद बचत गटाचे विक्री केंद्र!"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article