-->

खरे लोककलावंत, मुख्यमंत्र्यानी घोषीत केलेल्या कोरोना अर्थसहाय्या पासून वंचित ! लोककलावंतामध्ये कमालीची निराशा

खरे लोककलावंत, मुख्यमंत्र्यानी घोषीत केलेल्या कोरोना अर्थसहाय्या पासून वंचित ! लोककलावंतामध्ये कमालीची निराशा


 साप्ताहिक सागर आदित्य/

खरे लोककलावंत, मुख्यमंत्र्यानी घोषीत केलेल्या कोरोना अर्थसहाय्या पासून वंचित ! लोककलावंतामध्ये कमालीची निराशा                   

 वाशीम - गेल्या मार्च२०२० पासून, सततच्या लॉकडाऊनमुळे, राष्ट्रीय जनजागृती करीत लोककलेच्या मार्गातून, आपला व कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे, आपल्या न्याय हक्का करीता, सन् २०१७ पासून सन् २०२१ पर्यंत सातत्याने मा . जिल्हाधिकारी कार्यालय येथे, दरवर्षी,१४ ऑगष्ट व २४ ऑगष्टला धरणे आंदोलन करणारे हाडाचे कलाकार, कारंजा येथील श्रीमती कांताबाई सुदाम लोखंडे तथा उमेश हरीभाऊ अनासाने आणि जिल्ह्यातील इतरही लोककलावंताना, जिल्हा प्रशासनाने, मा उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलेल्या, मुख्यमंत्री पॅकेज मधून अर्थसहाय्य देण्यापासून सर्वथा वंचित ठेवलेले असल्यामुळे, कलावंतामध्ये या अन्यायाविरुद्ध उदासिनता पसरलेली आहे . याबाबत कांताबाई सुदाम लोखंडे यांनी असे कळवीले की, मला बालपणापासूनच भजन, गवळण, भारूड याचा छंद असून, दिघी येथील माझे गावात माझे स्वतःचे, " महर्षी वाल्मिकी भजनी मंडळ " असून मी अंदाजे वीस बावीस वर्षापासून दरवर्षी, श्रीक्षेत्र पंढरपूर, शेगाव, धामणगाव येथील पायदळ वारीत, भजनाद्वारे जनजागृती करीत असते . तसेच कामगार कल्याण केंद्र कारंजाच्या माध्यमातून, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छतेचे कार्यक्रम गावात करीत असते . माझेकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे सन २०१७ मध्ये मी, वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेच्या मानधनाकरीता माझा प्रस्ताव सादर केलेला होता . परंतु आजतागायत मला मानधन मंजूर करण्यात आलेले नाही . तसेच या महिलेच्या पतीचे, स्व. सुदाम लोखंडे यांचे दुसऱ्याच्या शेतजमीनीच्या रखवालीची मजूरी करीत असतांना, वन्यप्राणी रोहीच्या हल्ल्यात दुदैवी निधन झाल्यामुळे, सदहु महिला विधवा आहे . तिचे पती स्व.सुदाम लोंखडे  सुद्धा उत्कृष्ट भजनी लोककलावंत होते . तसेच ही महिला खंडोबाच्या गोंधळ जागरणात मुरळी म्हणून लोककला सादर करीत असते . त्यामुळे त्यांनी शासनाच्या अर्थसहाय्य योजनेकरीता रितसर प्रस्ताव सादर केलेला होता . परंतु कागदपत्राची शहानिशा न करता आणि कोणत्या त्रुटी आहेत ? ते तीला न कळविताच , दुदैवाने तिचा प्रस्ताव फेटाळण्यात आलेला आहे . दुसरे लोककलावंत उमेश हरिभाऊ अनासाने यांचा प्रस्ताव सुध्दा त्यांना कोणत्या त्रुटी आहेत ? ते न कळविताच जिल्हा प्रशासनाकडून फेटाळण्यात आलेला आहे . ह्या कलावंताना कला क्षेत्राचा वीस बावीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे .                             .         .            . तसेच सदर्हु योजनेबद्दल सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाने एकरकमी कोव्हिड दिलासा पॅकेज म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील ,५६००० छप्पन हजार लोककलाकाराला, प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे, एकूण रक्कम २८ : ०० कोटी मंजूर केलेली असल्याचे कळते .  असे असतांना शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या  निर्णय आदेश क्र संकीर्ण ८८२० / प्र.क्र.१४७ / सांका .४ दि .०३ नोहे .२०२१ नुसार वाशीम जिल्ह्यातील, वाशीम येथील ६७५ , मालेगाव येथील २८४, मंगरुळपीर येथील ९१ , मानोरा येथील ६३ , रिसोड येथील २५८, कारंजा येथील ११, अशा एकूण १३८२ कलाकारांनी अर्थसहाय्य मिळण्याकरीता, आपआपले प्रस्ताव सादर केलेले होते . परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या छाननी समितीने त्यापैकी, वाशिम येथिल कलाकारांच्या ६७५ पैकी फक्त १५, मालेगाव येथील २८४ पैकी फक्त ८, मानोरा येथील ६३ पैकी केवळ १, रिसोड येथील २५८ पैकी फक्त ७, कारंजा येथील ११ पैकी ४ प्रस्तावाला मंजूरी दिली . तर मंगरूळपिर येथील ९१ प्रस्तावामधून एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही . त्यामुळे कलाकारांचे म्हणणे असे पडले की, कलाकार हा अठरा विश्वे दारिद्रयात खितपत पडलेला कलावंत असतो . रोजी रोटीच्या चिंतेमुळे झोपडीत राहाणाऱ्याअनेक कलावंताकडे ते स्वतः अनेक वर्षापासून कलाकार असूनही साक्षी पुरावे उपलब्ध नसतात . त्यामुळे लोककलेचा सक्षम अपमान करीत,त्यांचा अंत न पहाता आपले निकष सौम्य करून, संबधित अधिकाऱ्यांनी, कलाकाराप्रती उदारता दाखवीत त्यांच्यावर दयामाया करून, एकदाच मिळणारी एकरकमी आर्थिक मदत त्यांना करावी . तरी जिल्हा प्रशासन कलाकारांची दखल घेणार का ? हा प्रश्नच आहे . तसेच जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही एवढे निर्बंध लादत असाल तर जनतेचा हा निधी परत जाईल किंवा कोठे खर्च होईल ? हे सुध्दा कुणाला कळणारच नाही . तरी मा . पालकमंत्री महोदय, मा . खासदार, जिल्ह्यातील सर्वच मा . आमदार तथा जिल्हा नियोजन समितीने , शासकिय निकष सौम्य करून ,आम्हाला प्रत्येकी पाच हजार रुपये अर्थसहाय्य सर्वच कलाकारांना मिळवून देण्याची मागणी, कांताबाई लोखंडे, उमेश अनासाने तथा जिल्ह्यातील सर्वच कलावंताकडून व्यक्त होत आहे .


 



0 Response to "खरे लोककलावंत, मुख्यमंत्र्यानी घोषीत केलेल्या कोरोना अर्थसहाय्या पासून वंचित ! लोककलावंतामध्ये कमालीची निराशा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article