
जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे आंतराष्ट्रीय बालीका दिनानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे आंतराष्ट्रीय बालीका दिनानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत आज दि . ११.१०.२०२३ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अनिल कावरखे यांच्या अध्यक्षतेखाली आंतराष्ट्रीय बालीका दिनानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले . सदर कार्यक्रमास अति . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . धर्मपाल खेळकर , वैद्यकीय अधिकारी डॉ . लक्ष्मीकांत राठोड , वैद्यकिय अधिक्षक , जिल्हा स्त्री रुग्णालय डॉ . किशोर लोणकर , वैद्यकिय अधिकारी , डॉ . हेंबाडे , वैद्यकीय अधिकारी डॉ . चोपडे यांच्या हस्ते स्त्री जन्माचे स्वागत करण्याकरिता नवजात बालीकांना ड्रेस व मातांना तसेच रुग्णांच्या उपस्थित नातेवाईकांना सुध्दा फळांचे वाटप करण्यात आले . तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रुग्णांच्या नातेवाईकांचे सुध्दा अभिनंदन केले . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अनिल कावरखे यांनी मुलींच्या जन्माच्या स्वागताकरिता मातांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले . तसेच अॅड . राधा नरवलिया यांनी मुलींच्या जन्माचे व शिक्षणाचे महत्व पटवून दिले . तसेच पीसीपीएनडिटी कायदयाच्या कडक अंमलबजावणी करीता बक्षिस योजनेबाबत उपस्थित सर्व माता रुग्णांना माहिती दिली . त्याबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाअंतर्गत अनधिकृत गर्भपात , गर्भलिंग तपासणीबाबत तक्रार असल्यास पीसीपीएनडिटी कार्यक्रमांअंतर्गत टोल फ्रि नं . १८००२३३४४७५ , तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ८४५०,८१४०६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा . सदरील माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत माहिती सांगितली . अधिपरिचारिका , श्रीमती ललिता घुगे , परिसेविका , श्रीमती लिना साबळे , परिसेविका , विश्वजित , अधिपरिचारिक ( पुरुष ) , निकिता भालेराव अधिपरिचारिका , रोशनी देशमुख अधिपरिचारिका , व . ओम राऊत , जिल्हा स्त्री रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी सदरील कार्यक्रमास उपस्थित होते . आरोग्य जिल्हा शल्य चिकीत्सक , जिल्हा रुग्णालय , वाशिम
0 Response to "जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे आंतराष्ट्रीय बालीका दिनानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत"
Post a Comment