
चित्रपट कलावंताचे फोटो लावण्यापेक्षा भगवंताचे फोटो लावा: ब्रम्हकुमारी भारती दिदि
साप्ताहिक सागर आदित्य
चित्रपट कलावंताचे फोटो लावण्यापेक्षा भगवंताचे फोटो लावा: ब्रम्हकुमारी भारती दिदि
श्रीमद् भागवत गिता ज्ञानयज्ञ प्रवचन मालेला भव्य प्रतिसाद
वाशीम: आज युवकांमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत आहे. घरामध्ये अनेकजण चित्रपटातील नट-नटी किंवा क्रिकेटचे फोटो लावतात. सकाळपासून येता-जाता या चित्रावर आपले लक्ष केंद्रीत होत असते. त्यामुळे तसेच विचार वाढत जातात. समाजामध्ये भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी चित्रपटातील नटनट्या यांचे फोटोपेक्षा घरात भगवंतांचे फोटो लावा असे आवाहन राजयोगिनी ब्रम्हकुमारी भारतीदिदि यांनी केले. स्थानिक मराठा कर्मशियल कॉम्प्लेक्स रिसोड रोडवर रामायण, महाभारत व भगवतगितेवर आधारीत श्रीमद भागवत गिता यज्ञ सप्ताह प्रवचनमालेत रविवार ३ डिसेंबर रोजी मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
यावेळी बम्हकुमारी भारतीदीदी यांनी पुढे सांगीतले की, जेव्हा घरामध्ये भगवंताच्या प्रतिमेकडे लक्ष जाते. तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विश्वास वाढतो. मनुष्य जीवन हे अनमोल आहे. त्याचे मोल जपणे जरूरी आहे. जीवनाला श्रेष्ठत्वाकडे नेण्यासाठी पुढाकार घ्या, आपण जे बघाल तसेच बनाल, कर्म हिच पुजा आहे. भगवंतांनी कर्म केले. त्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेणे जरूरी आहे. संसारामध्ये अपेक्षा ठेवू नका, मात्र कर्तव्याचे पालन पूर्ण निष्ठा व इमानदारीने पूर्ण करा असे आवाहन केले. आज प्रत्येकाला क्या कहेगे लोक हा रोग लागलेला आहे. मात्र आपल्याला जे चांगले वाटते ते करणे जरूरी आहे. भगवंत हनुमानाने जे रामाला चांगले वाटले ते केले. त्यांनी आपल्या हृदयात केवळ रामाला स्थान दिले. त्यामुळे जेव्हा हृदय उघडे करून दाखविले त्यावेळी राम आणि सितेचे दर्शन घडले. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करून कर्मप्रथान बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले.
0 Response to "चित्रपट कलावंताचे फोटो लावण्यापेक्षा भगवंताचे फोटो लावा: ब्रम्हकुमारी भारती दिदि "
Post a Comment