आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन श्री पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम...
साप्ताहिक सागर आदित्य
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
श्री पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम...
पिंपळा:-आज दिनांक १४/०८/२०२२ रोजी पिंपळा येथील श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विद्यालयांमध्ये देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.एन.देशमुख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून जी.एम.कदम सर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. व त्यानंतर गीत गायन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेची परीक्षक म्हणून जी.एम. कदम सर व एन. व्ही डोळे सर हे होते. गीत गाया स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप सुंदर देशभक्तीपर गीते सादर केली.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात आजादी का अमृत महोत्सव या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीभाषेत राष्ट्रभक्तीपर विचार व्यक्त केले. मुलांनी सुंदर सुंदर चारोळ्या सादर केल्या. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस.बी. देशमुख सर बी.ई. गवळी सर व शेवाळे सर यांनी काम पाहिले. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी विद्यालयातील परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ई. गवळी सर तर आभार प्रदर्शन एन.डी. भिंगे सर यांनी केले.
0 Response to "आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन श्री पांडुरंग विद्यालयाचा अभिनव उपक्रम..."
Post a Comment