श्री.पांडुरंग विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
पिंपळा :-येथील श्री.पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आमखेडा येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान पाटील,पिंपळा येथील पोलीस पाटील समाधान गुडदे व विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर यांनी ध्वज स्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण केले व यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी ऐ वतन.... या देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य सादर केले.अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. विद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्काऊट युनिटने सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यासाठी सहकार्य केले.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.ई. गवळी सर तर ध्वज सलामी श्री.एन. डी.भिंगे सर यांनी दिली. विद्यालयात आजादी का अमृत महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या इमारतीला रंगरंगोटी तसेच तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली होती.*
*कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली.*
0 Response to "श्री.पांडुरंग विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा"
Post a Comment