अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ध्वजारोहण.
साप्ताहिक सागर आदित्य
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ध्वजारोहण.
जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वाशिम इमारत प्रांगणात सकाळी 8:15 वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपाध्यक्ष डॉ.शाम गाभणे,अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे,जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सामुहिक राष्ट्रगीत गायनाने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा परिषद उपकर (सेस फंड) मधुन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे,पशु संवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उपमुख्य वित्त व लेखाधिकारी तुषार मोरे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती देशमुख,लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी,ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वानखडे,एमआरईजीएसचे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने आदि विभाग प्रमुखांसह जि.प.च्या कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Response to "अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ध्वजारोहण."
Post a Comment