कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते स्वातंत्र्य दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते स्वातंत्र्य दिन साजरा
आमखेडा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित गीताई ह्युमन काईंड डेव्हलोपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय आमखेडा (अहिंसातीर्थ) ता. मालेगाव . जिल्हा: वाशिम येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आले. भारत माता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ. पंजाबराव देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. परशरामजी जोगदंड, प्रमुख अतिथी हिम्मतराव जोगदंड, मा. पुंडलीकजी जोगदंड , राजेश घुगे, सुरेश जोगदंड, गजानन पाचरणे भागवत जोगदंड , आकाश मोवाडे , क्षेत्र व्यवस्थापक आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. परशराम जोगदंड आणि कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर राजेश घुगे, सूरेश जोगदंड आणि मा. गजाननजी पाचरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रथम वर्षातील विद्यार्थी अविनाश कांबळे आणि अभिजीत तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.द्वितीय वर्षाचा विद्यार्थी चेतन खाडे गीत सादर केला आणि कृषि महाविद्यालय येथील पाटील मॅडम व झनक मॅडम यांनी समूह गीत सादर केले. आमखेडा गावामधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आली आणि रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिण्यानिमित्य घोष वाक्य मनत रॅली पुर्ण गावभर काढण्यात आली. द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी - पुनम वाघमारे आणि विद्यार्थी - रोशन बेलखेडे यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी आकांक्षा पानझाडेनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अविनाश जोगदंड, प्राचार्य डॉ. एस. एम. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्य कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, आमखेडा प्राचार्य. डॉ.एस.एम. जाधव, प्रा. पी. टी. निचल, डॉ. ग. एच. वसु, डॉ. आर. एस. करंगामी, प्रा. एस. वाकुडकर, प्रा. एस. टी. जाधव, प्रा. अरुण वाघ, प्रा. सुमेध मनवर, प्रा. मोहन सुरुशे , पखाले सर व कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा. युवराज गवळी , अनिल तायडे, रवी लठाड. आणि सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 Response to "कृषि महाविद्यालय आणि कृषि तंत्र विद्यालय,आमखेडा येते स्वातंत्र्य दिन साजरा "
Post a Comment