वाशिम जिल्हा परिषदेत सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्हा परिषदेत
सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
वाशिम आज १७ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात करण्यात आले.
सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोन्द्रे,संजय जोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी,कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमेश शिंदे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी डाबेराव यांनी मानले.
0 Response to "वाशिम जिल्हा परिषदेत सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात"
Post a Comment