जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात
वाशिम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर, नितीन जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख शिवाजी भोसले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, भूमि अभिलेख विभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय,महिला व बालकल्याण विभाग कार्यालय आणि नगर विकास कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने सहभागी होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी मानले.
0 Response to "जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात"
Post a Comment