
भागवत गिता ही सन्यासी नव्हे तर संस्कारी बनण्याचे माध्यम: भारती दिदी
साप्ताहिक सागर आदित्य
भागवत गिता ही सन्यासी नव्हे तर संस्कारी बनण्याचे माध्यम: भारती दिदी
गिता ही जीवनाचा सार आहे. जीवनाचा मुलमंत्र आहे. न्यायालयात सुध्दा गितेवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. ज्याला गिता कळली, त्याला जिवन जगण्याची कला कळली. भावगत गिता ही सन्यासी नव्हे तर संस्काराची बनण्याचे ज्ञान देते असे प्रतिपादन राजयोगीनी ब्रम्हचारीणी भारती दिदी यांनी केले. स्थानिक मराठा कमर्शियल कॉम्प्लेक्स रिसोड रोड येथे आयोजित श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह रामायण महाभारत व गितेवर आधारीत प्रवचनमालेमध्ये भक्तांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी भारती दिदी पुढे म्हणाल्या की, मनुष्य जीवन हे अनमोल आहे. मनुष्य जीवन सार्थक करणे हे आपले कर्तव्य आहे. व्यक्ती आज साधन, सामग्रीच्या मागे धावत असून मर्यादेचे उल्लंघन करीत आहे. जीवनामध्ये मर्यादा जरूरी आहे. घर, परिवार, संसार, राज्य व देशा प्रती कर्तव्याचे पालन करतांना मर्यादेचे भान ठेवा. कर्माला महत्व द्या असे आवाहन केले. कर्माचे दिव्य रहस्य याचा उलगडा त्यांनी केला. मनुष्य आत्मा ही मनुष्य योनीमध्ये जन्म घेते. पशु, पक्षांमध्ये ती जन्म घेत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. परमात्माची आठवण ही जीवनाला सुरक्षीत करते असे सांगीतले. आज श्रीकृष्ण रूख्मीनी विवाह पार पडला. यामध्ये श्रीकृष्णाची भूमिका शुभांगी डौलसे, रूख्मीनीची भूमिका प्रीती मेहकरकर, ब्राम्हणाची भूमिका गणेश अवस्थी, ब्रम्हाची भूमिका प्राणयु गारूळे, शिवचे स्वरूप भूमिका बगाडे, विष्णुची भूमिका दिव्या शर्मा यांनी पार पाडली. यावेळी भूमिका बगाडे यांनी श्रीकृष्ण-रूख्मीनी विवाहामध्ये शिवनृत्य सादर केले.
0 Response to "भागवत गिता ही सन्यासी नव्हे तर संस्कारी बनण्याचे माध्यम: भारती दिदी"
Post a Comment