
माविम अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त केकतउमरा येथे जनजागृती रॅली व रांगोळी स्पर्धा संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
माविम अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त केकतउमरा येथे जनजागृती रॅली व रांगोळी स्पर्धा संपन्न
"स्पार्क प्रकल्प व लोकसंचालित साधन केंद्र यांचा पुढाकार"
माविम व स्पार्क आणि महिला इंटरनॅशनल फंड फॉर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट (IFAD) सहायित आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) यांच्या संयुक्त विधमाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वाशिम द्वारा दिव्यांग व्यक्ती करिता “स्पार्किंग डिसॅबिलिटी इनक्लुझिव्ह रुरल ट्रान्सफॉर्मेशन” SPARK प्रकल्प ग्रामीण भागाकरिता पायलट प्रोजेक्ट आणि आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र अनसिंग कळंबा महाली केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पोस्टर जनजागृती रॅली आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह येथे करण्यात आले होते. या मधी केकतउमरा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र वरीष्ठ शाळेतील विद्यार्थीयांच्या समावेश होता. गावामधून प्रभात फेरी काढून पोस्ट जनजागृती रॅली काढून दिव्यांग दिना जागृती घोषणा देण्यात आला.या रॅलीचे प्रतिनिधीत्व सीएमआरसी व्यवस्थापक संगिता शेळके, मुख्याध्यापक प्रा.राम वाणी,शिक्षक सुरेश गोटे,अरुण इंगोले, दिलीप शिंदे वंदना इंगोले, विष्णुदास शिंदे,गणेश गोटे,संजय साबळे, सुभाष काकडे ,शिवाजी पोटे यांनी सहकार्य केले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.,नंतर शालेय विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर कार्यक्रमांचे अध्यक्ष ग्राम पंचायत केकतउमरा सचिव राजेश शेकळे, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते तथा लोक संचालित साधन केंद्र अनसिंग अंतर्गत माविम मित्र मंडळ अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर ,लोक संचालित साधन केंद्र अनसिंग च्या व्यवस्थापक - संगीता शेळके, संतोष मुखामाले, प्रमोद गोरे, लेखापाल प्रदिप देवकर, लेखापाल सिमा पाचपिल्ले, सल्लागार सागर विभुते,अरुण सुर्वे, DIF आरती हिंगमिरे,नसीम मांजरे,कोमल मुठाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.उपास्थित सर्वांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी दिव्यांग नागरिक व उपस्थीत गावकरी महिला बचत गट समुह यांना मार्गदर्शन केले. या मध्ये दीव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचा योजना नविन नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
या मध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमधी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामधे प्रथम क्रमांक सायली पडघान , द्वितीय यशस्वी पट्टेबहादुर ,तृतीय श्रेया वालुळकर , यांनी पटकाविले यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गेल्या ४ वर्षा पासून माविम मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्य करनारे बचत गट समुह महिलांना व ग्रामीण भागांतील युवक युवती दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष मदत आणि मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे प्रदिप कडुजी पट्टेबहादुर यांना दिला जाणारा महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुधारक सन्मान पुरस्कार 2023 चा देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिव्यांग व्यक्ती यांचा देखील सन्मान करण्यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप देवकर यानी केले, तर प्रास्ताविक संगिता शेळके मॅडम यांनी केले सर्वांचे आभार शारदा तेलगोटे यांनी मानले. या कार्यक्रमाला साठी सह्योनिगी सुनिता मनवर,आशा इंगळे, पूनम पट्टेबहादुर,शारदा तेलगोटे,वनिता तायडे,गीता आमटे, सुरेखा कदम, यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील माविम महिला बचत समूहाच्या अध्यक्षा सदस्या व महिला गावातील नागरिक विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
0 Response to "माविम अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त केकतउमरा येथे जनजागृती रॅली व रांगोळी स्पर्धा संपन्न"
Post a Comment