
आपण सुधारलो तर जग सुधरेल- ब्रम्हकुमारी भारती दिदि
साप्ताहिक सागर आदित्य
आपण सुधारलो तर जग सुधरेल- ब्रम्हकुमारी भारती दिदि
ईश्वर हेच सृष्टीचे निर्माता
वाशीम: जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आज समाजातील मानव हा स्वार्थ, मोह, माया यांच्या विकारात अडकत चाललेला आहे. कोणत्याही गोष्टीची सुधाराची प्रक्रिया ही स्वत: करावी लागते. जर आपण सुधारलो तर संपूर्ण संसार व जग सुधरेल. भारत पुन्हा सोने की चिडीया बनू शकतो असे प्रतिपादन प्रमुख वक्ते राजयोगिनी ब्रम्हकुमारी भारती दिदी यांनी केले.
स्थानिक मराठा कमर्शियल कॉम्प्लेक्स रिसोड रोड येथे आयोजित श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहात प्रथमच रामायण, महाभारत व भगतगितेवर आधारीत मालेमध्ये ४ डिसेंबर रोजी भक्तांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. ब्रम्हकुमारी भारती दिदी यांनी सांगीतले की, ईश्वर हा जगाचा रचिता आहे. ब्रम्हाजी हे सरस्वतीच्या चेहर्यावर मोहित झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे नाते हे पिता-पुत्रीचे झाले. मात्र अनेक जण माहिती नसतांनाही देवीदेवतांवर टिप्पणी व त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात. ही प्रवृत्ती स्वत:साठीही घातक आहे. चांगले कर्म व चांगले विचार जोपासल्यास त्याचा लाभ स्वत:सोबत परिवाराला मिळत असतो. ज्ञान जीवनात जरूरी असल्याचे सांगीतले. आज आकर्षक झाँकी ने भक्तांचे लक्ष्य केंद्रीत केले. यामध्ये शिवच्या भूमिकेत श्रीकांत ठाकरे, विष्णूच्या भूमिकेत गणेश शिंदे, ब्रम्हाच्या भूमिकेत प्राणयु गारूडे, वासुदेवच्या भूमिकेत कैलास मेहकरकर, नंदबाबाच्या भूमिकेत मुकेश पटेल, यशोदाच्या भूमिकेत पिनल पटेल, तर कृष्णाच्या भूमिकेत अगस्ते वानखेडे यांनी भूमिका साकारली. आरती यजमानांमधये डॉ. पकंज दागडीया सह परिवार सहभागी झाले होते. तरूण क्रांती मंच व भारती जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा भारतीदिदी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रवचन मालेमध्ये भक्तांची अलोट गर्दी होत आहे. ७ डिसेंबर पर्यंत आयोजित भगवत गिता प्रवचन मालेचा लाभ घेण्याचे आवाहन ओमशांती ब्रम्हकुमारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Response to "आपण सुधारलो तर जग सुधरेल- ब्रम्हकुमारी भारती दिदि"
Post a Comment