
आमचे कर्म हेच आमच्या सुख व दु:खाचे कारण-ब्रम्हकुमारी भारती दिदी
साप्ताहिक सागर आदित्य
आमचे कर्म हेच आमच्या सुख व दु:खाचे कारण-ब्रम्हकुमारी भारती दिदी
श्रीमद् भागवत गिता ज्ञानयज्ञ प्रवचन मालेला भव्य प्रतिसाद
जीवनात सुख आणि दु:ख येत असतात. आमचे कर्म हेच आमच्या सुख आणि दु:खाचे प्रमुख कारण आहे. सुख आणि दु:ख याकरीता केवळ आपणच जबाबदार आहोत. आपले कर्म आपल्या सोबत असतात. गितेमध्ये जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल हा उपदेश सांगीतलेला आहे. पाप आणि पुण्य आमच्यासोबत असते. त्यामुळे प्रत्येकांनी स्वत:ला ओळखावे असे आवाहन कथाप्रवक्ता ब्रम्हकुमारी भारती दिदी यांनी केले.
स्थानिक मराठा कमर्शियल कॉम्प्लेक्स रिसोड रोड येथे आयोजित श्रीमद् भागवत गिता ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये प्रथमच रामायण, महाभारत व भगवत गितेवर आधारीत प्रवचनमालेमध्ये २ डिसेंबर रोजी भक्तांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी भारती दिदी यांनी सांगितले की, जीवनामध्ये धन, संपत्ती, नाव, पुत्र, पुत्री, सुख, शांती मिळेल याची शाश्वती देता येत नाही. मात्र मृत्य हेच खरे सत्य आहे. जो व्यक्ती येतो, त्या व्यक्तीला हे जग सोडावेच लागते. मात्र व्यक्ती आज ज्या गोष्टी मिळणार नाहीत. त्यामागे धावत आहेत. राजा, रंक, फकीर, प्रत्येकाला हे जग सोडावे लागते. त्यामुळे मृत्यू पूर्वी आपण स्वत:ला ओळखले पाहिजे. आज व्यक्ती चंद्रावर पोहचला आहे. विज्ञानाच्या प्रगतीच्या उंबरठयावर व्यक्ती आकाश आणि पातळात खोज करीत आहे. सोबतच व्यक्ती हा मंगळ ग्रहावर पोहचला आहे. तरी सुध्दा त्याच्या जीवनात मंगलमय वातावरण नाही. आकाश आणि पातळात शोध घेण्यापेक्षा व्यक्तीने स्वत: आत्मचिंतन करून स्वत:चा शोध व बोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. स्वामी विवेकानंदाचे उदाहरण देत गुरू आणि शिष्यामधील संवाद त्यांनी सांगीतला. गिताज्ञान हे सर्व समस्येचे निराकरण करते. जीवन जगण्याची कला शिकवीते. वास्तविकतेवर आधारीत हे ज्ञान केवळ गितेतून मिळते. ज्ञान प्राप्तीसाठी समाधान व सुख, शांतीसाठी प्रत्येकाने या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आरतीचे यज्ञमान सौ. रेखा जिवनानी, माजी नगराध्यक्ष मिराताई तुपसांडे, प्रविण राऊत, डॉ. सौ. पल्लवी कड, डॉ. अनिल कड, गोपाल जीवनाणी, समाधान पिवळतकार, सौ. भारती निलेश सोमाणी, पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, ब्रम्हकुमार संतोष भाईजी, हनुमान कोंगे, सौ. आशा कोंगे, गणेशराव सरनाईक, सौ. लिना सरनाईक, विष्णुपंत भोयर, सौ. सुनिल भोयर आदिंजण उपस्थित होते. सर्वांचा यावेळी ब्रम्हकुमारी भारती दिदि यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राजयोगीनी ब्रम्हकुमारी ज्योतीदिदी, ब्रम्हकुमारी स्वाती दिदि, ब्रम्हकुमारी पार्वती दिदी, ब्रम्हकुमारी पुजा दिदी, ब्रम्हकुमारी सिमादिदी, ब्रम्हकुमार सर्वश्री महेंद्रभाई, दिगंबरभाई, कैलास भाई, सुधीर भाई, शंकरभाई, विठ्ठलभाई, सरोदेभाई, अशोकभाई, सुरेशभाई, बबनभाई, मुकेशभाई, हरिषभाई, मुंदरेभाई, चंदनभाई, चुन्नुभाई, गोगरेभाई समवेत सर्व आयोजकांनी परिश्रम घेतले.
0 Response to "आमचे कर्म हेच आमच्या सुख व दु:खाचे कारण-ब्रम्हकुमारी भारती दिदी"
Post a Comment