-->

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा  दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन


वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने आज  ३ डिसेंबर  रोजी जागतिक दिव्यांग दिन सामाजिक न्याय भवन वाशिम येथे उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमात दिव्यांग नागरिकांकरीता असणारे कायदे व दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.विजय टेकवाणी होते. यावेळी ऍड शुभांगी खडसे ,ऍड हेमंत इंगोले, सहाय्यक लोक अभिरक्षक यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला  ज्ञानबा पुंड अधीक्षक शासकीय बहुउद्देशीय संमिश्र अपंग केंद्र तसेच दिव्यांग शाखेचे सहाय्यक सल्लागार श्रीमती ए.ए.राऊत व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार अधीक्षिका श्रीमती कल्पना ईश्वरकर यांनी मानले.संचालन शरद चोपडे यांनी केले.

0 Response to "आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article