-->

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमंत तायडे यांचा सत्कार

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमंत तायडे यांचा सत्कार



साप्ताहिक सागर आदित्य/

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमंत तायडे यांचा सत्कार

वाशिम - डॉ बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सर्किट हाऊस सिव्हिल लाईन वाशिम येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई सोनोने तर प्रमुख उपस्थिती म्हणून संगीता इंगोले, अरूणा ताई ताजणे, वाशिम पंचायत समितीच्या सभापती रेश्माताई गायकवाड, मधूरानी बनसोड, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड,पिरीपाचे वाशिम जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइं अध्यक्ष तेजराव वानखेडे,अरुणा आवचार, परमेश्वर अंभोरे,अनिल कांबळे, सोनाजी इंगळे, गोवर्धन चोथमल, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थितीतांनी पुष्पहार अर्पण केले. नंतर प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन लाभले.तर यावेळी ज्या महिलांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्या पाल्यांना शिकवून उच्चपदस्थ नेवून पोहचविले अशा कर्तृत्वशील महीलांचा सत्कार करण्यात आला. आणि याच कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर जि.प.मा.सहकारी पतसंस्था अकोला-वाशीम पतसंस्थेचे मध्ये निवडून आल्या बद्द्ल हेमंत तायडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद तायडे यांनी केले.तर सुत्रसंचलन अभिनेत्री हंसीनी उचीत तर आभार प्रदर्शन राजकुमार पडघान यांनी केले.  कार्यक्रमाला कवी महेंद्र बबनराव खिल्लारे, ताजने, अरविंद उचित, यांचे सह सत्कार मुर्ती यांचीही उपस्थिती होती.

 

 


Related Posts

0 Response to "माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेमंत तायडे यांचा सत्कार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article