
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 शेतकऱ्यांसाठी ऊर्जा स्वावलंबनाची नवी दिशा
साप्ताहिक सागर आदित्य
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0
शेतकऱ्यांसाठी ऊर्जा स्वावलंबनाची नवी दिशा
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जलद गती देण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0, दि. 8 मे 2023 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे. कृषी वाहिन्यांना जलद गतीने सौरऊर्जेद्वारे तयार झालेली वीज देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डिसेंबर 2025 (मिशन २०२५) पर्यंत किमान 30 टक्के कृषी वीज वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्यासाठी सुमारे 7,000 मे.वॅ. विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) कंपनीची नोडल एजन्सी म्हणून काम करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. एमएसएपीएल सौर ऊर्जा विकासकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत आहे. एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनी मार्फत 15 हजार 709 मे.वॅ. क्षमतेकरिता निविदा जाहिर केल्या असून 14 हजार 602 मेगावॅट क्षमतेसाठी ऊर्जा प्रकल्प उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यापैकी 10 हजार 88 मेगावॅटचे वीज खरेदी करार देखील करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 150.2 मे.वॅ. क्षमतेचे 37 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेले असून, या उपकेंद्रांमधील एकूण 123 कृषी वाहिन्यांवरील 48 हजार 972 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील एकूण 65 उपकेंद्रांमार्फत 70 हजार कृषी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी व पुरवठा लक्षात घेता सर्व कृषी ग्राहकांना चक्रकार पद्धतीने दिवसा /रात्री आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मार्फत जिल्ह्यातील कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या दूरदृष्टी धोरणातून जिल्ह्यातील 37 उपकेंद्राची निवड मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात आलेली आहे यामध्ये 155 मेगावॅट क्षमतेचे प्रोजेक्ट करण्यात येत आहे. या प्रोजेक्ट मार्फत सुमारे 45 हजार कृषी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीत हीसई, उंबर्डा बाजार, धनज आणि पेटखदानपूर येथील बारा मेगावॅट क्षमतेचे चार सोलर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. त्याद्वारे सुमारे 3 हजार 500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सोलर प्रोजेक्ट करता लागणाऱ्या जागा लिच्या माध्यमातून सरकारी जमीन लीजच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ज्यामुळे सदर प्रकल्पाचे काम अत्यंत जलद गतीने होत आहे. माहे जून 2025 पर्यंत मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून 100 मेगावॅट क्षमतेचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
शेतकऱ्यांना आपल्या नजिकच्या महावितरण कार्यालयात किंवा
अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करता येईल.
संकलन:
अनिल कुरकुटे,
जिल्हा माहिती कार्यालय
वाशिम.
0 Response to "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 शेतकऱ्यांसाठी ऊर्जा स्वावलंबनाची नवी दिशा"
Post a Comment