
काय आहे नैसर्गिक शेती?
साप्ताहिक सागर आदित्य
काय आहे नैसर्गिक शेती?
नैसर्गिक शेतीमध्ये विषारी रसायनांचा वापर कायमस्वरूपी बंद करून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जमिनीत वाढविणे केवळ हा एकमेव उद्देश नसून अनेक उद्देश नजरेसमोर ठेवून नैसर्गिक शेतीची कास धरायला हवी. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या रासायनिक घटकांच्या वापराने जमीन, पाणी, हवा या नैसर्गिक संपदांचा प्रदूषणामुळे होणारा ह्रास टाळण्यासाठीही नैसर्गिक शेती अत्यंत महत्त्वाची आहे.
परंतु सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा कल हा नैसर्गिक शेतीकडे मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी नैसर्गिक शेती करण्यासाठी लागणाऱ्या पूरक गोष्टी त्याकडे उपलब्ध नसल्याने नैसर्गिक शेती ही रासायनिक शेतीपेक्षा कष्टाची व अवघड वाटते.
बहुतांशी शेतकरी सध्या परिस्थितीमध्ये रासायनिक शेती करतात , शेतकऱ्यांकडे नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे किमान एक तरी पशुधन त्यांच्याकडे असायला हवे जेणेकरून तो आत्मनिर्भर असेल शेणखत किंवा कंपोस्ट खत सेंद्रिय कर्ब वाढविण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे असून बाहेरून विकत घ्यायचे तर शेतकऱ्यांकडे ते सहज उपलब्ध होत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांकडे पशुधन असायचे आज शेतकऱ्यांना मजुरांची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने शेतकरी पशुधन ठेवायला तयार नाही त्यामुळे शेणखताची उपलब्धता अत्यंत कमीच आहे शेतीचा पोत सुधारण्याकरिता शेतकरी पूर्वी शेणखताचा वापर करायचे आता तो नगण्य झालेला दिसतोय त्याचे मुख्य कारण म्हणजे पशुधनाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहे शेतकऱ्यांकडे अशा परिस्थितीमध्ये इच्छा असूनही नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करण्यासाठी गरजेच्या असलेल्या शेत बांधावर तयार होत असलेल्या निविष्ठांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे जसे की अत्यंत कमी गोमय व गोमूत्र उपलब्ध असेल तरीसुद्धा गोकृपा अमृत, किंवा जीवामृत या गोष्टींचा वापर अपेक्षित आहे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवण्याकरता शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर तणनाशकाचा वापर बंद केला पाहिजे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे: कीटकनाशकाला पर्याय म्हणून निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, पक्षी थांबे लावणे, चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे मोठ्या प्रमाणात वापरायला हवे शेतकऱ्यांना या गोष्टीची कल्पना असूनही शेतकरी याबाबत निर्णय घेत नाही याची खंत आहे,
किमान घरच्या खाण्याकरिता तरी विषमुक्त भाजीपाला तयार करून नैसर्गिक शेतीची सुरुवात करायला हवी.
नैसर्गिक शेतीमध्ये गोडी निर्माण होण्याकरिता शेतकऱ्यांनी नियंत्रित क्षेत्रावर कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागेल तेवढ्या क्षेत्रामध्ये तरी नैसर्गिक पद्धतीने लागणाऱ्यांना धान्य भाजीपाला पिकवायला हवा. याकरिता त्याला लागणारी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
खरीप हंगामात
20 गुंठेअर्धा एकर क्षेत्रामध्ये तूर उडीद मूग
अर्धा एकर क्षेत्रामध्ये गावरान ज्वारी
10 गुंठे क्षेत्र भाजीपाला पिकाखाली दहा गुंठे क्षेत्राला जाळीचे कुंपण करून कुंपणा भोवती शेवगा लावा कुंपणा वर विविध प्रकारचे वेल ठेवाल ज्यामध्ये सर्व प्रकारचे वेलवर्गीय भाजीपाला दोडके कारले दुधी भोपळा काकडी आणि रानभाज्या जसे कर्टुळे ,पडवळ
आत मध्ये 3 गुंठे क्षेत्र पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, आंबट चुका प्रत्येकी एक गुंठा फळे भाज्या टोमॅटो वांगी, मिरची, भेंडी, एक गुंठा दैनंदिन आहारात लागणाऱ्या औषधी वनस्पती क्षेत्राच्या मधोमध दोन गुंठे क्षेत्रावर लावाव्या जसे की कोरफड, पुदिना, नींबू , पपई, कढीपत्ता, पुदिना, गुळवेल, आळू,
तसेच मसाला स्वर्गीय पिके आले म्हणजेच अद्रक लसुन हळद ,जिरे ,मिरे,ओवा गरजेपुरते यासारख्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी.
रबी हंगामा मध्ये गहू हरभरा किमान आपल्या कुटुंबाची गरज लागेल एवढा तरी नैसर्गिक पद्धतीने करावा त्यामध्ये उत्पादनात थोडी घट संभाव्य आहे परंतु विष मुक्त व सकस अन्न हे आरोग्यदायी असल्याने आपल्याला आता तरी निर्णय घ्यायला हवा
40 गुंठे एक एकर क्षेत्रावर गहू
20 गुंठे अर्धा एकर क्षेत्रावर हरभरा
20 गुंठे क्षेत्रावर करडई तेलबिया
उन्हाळी हंगामात
तीळ मूग हे पिके येतात
तसेच विष मुक्त टरबूज खरबूज पण चांगला पैसा देईल
किमान गरजेपुरते नैसर्गिक पद्धतीने पिकवायला हवे.
या सर्व गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत याची पूर्ण जाणीव आहेच परंतु शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरून भविष्यातील शेतीला स्वीकारायला हवं आज बाजारामध्ये विषमुक्त अन्न आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पैसा मिळवून देऊ शकतो शिवाय आपल्या जमिनीचा पोत सुधारेल परिणामी लागत खर्च कमी होईल आणि पर्यावरण रक्षण होईल. विषमुक्त सकस आहार मिळाल्याने त्याचे आरोग्य सुदृढ असेल
आपल्या संपूर्ण क्षेत्राच्या बांधावर विविध प्रकारची फळांची झाडे लावा ज्यामध्ये आंबा,चिकू, फणस,नारळ, आवळा, सिताफळ, रामफळ ,डाळिंब,संत्रा ,मोसंबी,लिंबू आपल्या शेतातील फळे उपलब्ध झाल्याने शरीराला लागणाऱ्या विविध खनिजे प्रथिने कर्बोदके यांची गरज पूर्ण होईल मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होईल ज्यामध्ये जैवविविधतेची संरक्षण होऊन मोठ्या प्रमाणात पक्षांची संख्या वाढेल पर्यायाने पर्यावरण रक्षण होईलच आनंदी व निरामय आयुष्य जगता येईल.
नैसर्गिक शेतील शेतमाल आपण शेतकरी ते ग्राहक विकल्यास नफा दुप्पट मिळतो शिवाय आपली शेती किफायशीर होईल तर त्यात अधिक रुची वाढेल आणि शेती पूरक व्यवसाय शेतात करण्यास बळ मिळेल शेती पूरक व्यवसायामध्ये महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे पशुपालन व दुग्ध व्यवसाय ज्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढविण्यास उपायुक्त असे शेणखत मिळेल आणि दुग्ध व्यवसायातून अर्थार्जणही होईल.
किमान एक हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने केल्यास शेतकरी आपल्या कुटुंबीयांच्या सर्व दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतो.
आजचा शेतकरी मात्र नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी धजत नाही कारण सर्वात मोठी समस्या म्हणजे मजुराच्या घराच्यावर शेती आणि सध्या परिस्थितीमध्ये मजूर मिळायला तयार नाहीत त्यामुळे निंदणी खर्च वाचवण्याकरता मोठ्या प्रमाणात तणनाशकांचा वापर केला जातो शिवाय पक्षी थांबेल सापळे लावण्यासाठी सुद्धा मजूर लागतात म्हणून खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर सुद्धा केल्या जातो शेणखत कंपोस्ट खत बनवण्यासाठी सुद्धा मेहनत लागते म्हणून खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो एखादा नैसर्गिक शेतीकडे जाण्याची इच्छा दर्शवितो परंतु त्यातही त्यांना योजनेची गरज असल्याचे सांगतोय
शेतकरी मित्रांनो त्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू झाले आहे.
आपण किमान एक एकर शेती नैसर्गिक पद्धतीने करू शकता 125 शेतकऱ्यांचा गट करून सेंद्रिय प्रमाणिकरण करून आपली शेती ही नैसर्गिक शेती असल्याचे प्रमाणपत्र मिळवून बाजारपेठेमध्ये आपला शेतमाल ऑरगॅनिक म्हणून विकता येईल त्यास उत्तम दर मिळवू शकता.संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.
_जयप्रकाश लव्हाळे,
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक
आत्मा वाशिम
संकलन:
अनिल कुरकुटे,
जिल्हा माहिती कार्यालय
वाशिम
0 Response to "काय आहे नैसर्गिक शेती? "
Post a Comment