स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांचे मरणोत्तर नेत्रदान
मैजे मालेगांव ता. मालेगांव जि. वाशिम येथील सुनिल मोहनलाल खटोड यांचे वडिल स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी दिनांक १६/१२/२०२४ रोजी रात्री ०९:३० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण खटोड कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांचे निधन झाल्याने संपुर्ण खटोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना खटोड कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा डॉ. निलेश मानधने याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर,यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता खटोड कुंटुबाचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन खटोड कुटूंबाचे आभार मानले आहेत.
नेत्रदानासाठी संपर 9922519948
0 Response to " स्व. मोहनलाल राधाकिसन खटोड यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment