३२ पैकी २४ तक्रारींचा निपटारा तक्रार निवारण दिन : ४६ तक्रारदार गैरहजर
साप्ताहिक सागर आदित्य
३२ पैकी २४ तक्रारींचा निपटारा
तक्रार निवारण दिन : ४६ तक्रारदार गैरहजर
वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात गुरुवार, १९ डिसेंबर रोजी आयोजित तक्रार निवारण दिनात ३२ पैकी २४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
नागरिकांच्या तक्रारीवर उपाययोजना करून त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून दर महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. पहिल्या तक्रार निवारण दिनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. मध्यंतरी विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात तक्रार निवारण दिन रद्द केला होता, १९ डिसेंबरच्या तक्रार निवारण दिनात ७८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, ४६ तक्रारदार गैरहजर राहिल्याने ३२ तक्रारीवर चर्चा करण्यात आली. २४ तक्रारींचे निराकरण करण्यात विभाग प्रमुखांना यश आले. ८ तक्रारीचे निराकरण होऊ शकले नाही. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए एल बोंद्रे, लघु सिंचन विभागाचे उपअभियंता संदेश चवरे आणि शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची यावेळी उपस्थिती होती.
--------
तक्रार निवारण दिनाचा लेखाजोखा
एकुण प्राप्त तक्रारी-78
हजर तक्रारदार-32
गैरहजर तक्रारदार-46
तक्रारनिवारण-24
समाधान न झालेले- 8
0 Response to "३२ पैकी २४ तक्रारींचा निपटारा तक्रार निवारण दिन : ४६ तक्रारदार गैरहजर"
Post a Comment