वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची महत्वाची घोषणा, बिलात मिळणार तब्बल इतकी सूट!
साप्ताहिक सागर आदित्य/
वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची महत्वाची घोषणा, बिलात मिळणार तब्बल इतकी सूट!
मुंबई - राज्यात सध्या थकीत वीज हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. हे थकीत वीज बिल भरण्यासाठी सरकारकडून नागरिकांना नेहमी आव्हान केलं जात. मात्र, यावेळी राज्यातील हा बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. थकीत विद्युत बिलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, वीजबिलाची ही थकबाकी एकरकमी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोणार येथे ही मोठी घोषणा केली आहे. तेथील एका मेळाव्यात ते बोलत होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. विलासराव देशमुख अभय योजना असं या योजनेचं नाव असल्याचं ऊर्जा मंत्री राऊत यांनी जाहीर केलंय.
विशेष बाब म्हणजे, उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ करण्यात येणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ केली जाईल. ही मोठी सूट नागरिकांना देण्यात आली असली तरी कृषि पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला नाही.
0 Response to "वीज बिल ग्राहकांसाठी राज्य सरकारची महत्वाची घोषणा, बिलात मिळणार तब्बल इतकी सूट!"
Post a Comment